Soyabin Kapus anudan 2023 : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने प्रति हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज आपण या लेखामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5000 रुपयांचे अनुदान , ई – केवायसी आणि संमती पत्र याबाबत माहिती जाणून घेऊया.
Soyabin Kapus anudan 2023 योजनेचे उद्दिष्ट
कृषी विभागाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2023 – 24 या खरीप हंगामात मदतीची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे . कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी मदत देण्याचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना आधार देणे आणि शेतीतील उत्पन्नात वाढ करणे हे आहे. कृषी आयुक्ताच्या निर्देशानुसार , उर्वरित चार लाख शेतकऱ्यांचे अनुदान देण्यात येणार आहे.हे अनुदान निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर वाटप होणार असल्याचे सांगितले गेले आहे .
हे वाचा : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा प्रश्न: महायुती सरकारकडून नवीन अपेक्षा
अनुदानासाठी अटी आणि निकष
- अनुदानाची रक्कम: प्रति हेक्टरी 5000 रुपये.
- क्षेत्रमर्यादा: जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंतचे शेतकरी पात्र.
- बँक खाते: आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक.
- संमतीपत्र: संयुक्त खातेदारांसाठी एफिडेविट स्वरूपातील संमतीपत्र अनिवार्य.
कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे.आतापर्यंत कापूस आणि सोयाबीन अनुदान नोंदणी प्रक्रिया 72 लाख शेतकऱ्यांची पूर्ण झालेली आहे . यामध्ये 53 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2578 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, तर उर्वरित 4 लाख शेतकऱ्यांचे अनुदान अजून दिले नाहीत .
संमती पत्र न सादर करणारे शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे.
Soyabin Kapus anudan 2023 आतापर्यंत अंदाजे 24 लाख शेतकऱ्यांनी संमती पत्र सादर केलेली नाही. यामध्ये बहुतांश शेतकरी संयुक्त खातेदार आहेत. या संयुक्त खात्यात वादा असल्याने मदत वाटप रखडले आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया सुरू होईल.4 लाख शेतकऱ्यांना लवकरच 100 कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Soyabin Kapus anudan 2023 ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?
Soyabin Kapus anudan 2023 ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही.
- जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर भेट द्या.
- आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती द्या.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल.
उर्वरित शेतकऱ्यांसाठी वाटप प्रक्रिया
आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित 4 लाख शेतकऱ्यांना अनुदान वाटप होईल. अंदाजे 100 कोटी रुपयांचे अनुदान लवकरच वितरित केले जाईल.
संयुक्त खात्यांसाठी विशेष सूचना
अंदाजे 24 लाख शेतकऱ्यांनी अद्याप संमतीपत्र सादर केलेले नाही.
- एफिडेविट तयार करा.
- आवश्यक कागदपत्रांसह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
- त्यानंतर अनुदानाचा लाभ मिळवता येईल.
Soyabin Kapus anudan 2023 महत्वाचे मुद्दे
मुद्दा | माहिती |
---|---|
अनुदान रक्कम | प्रति हेक्टरी 5000 रुपये |
अधिकतम क्षेत्र | 2 हेक्टर |
संमतीपत्र आवश्यक आहे का? | हो, संयुक्त खात्यांसाठी |
नोंदणी केलेले शेतकरी | 72 लाख |
उर्वरित शेतकरी | 4 लाख |
शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना
Soyabin Kapus Anudan 2023 ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. पात्र शेतकऱ्यांनी वेळेत संमतीपत्र आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ सहज मिळेल.Soyabin Kapus Anudan 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये अनुदान मिळणार. प्रक्रिया, आवश्यकता व इतर तपशील जाणून घ्या.
कापूस आणि सोयाबीन अनुदान स्टेटस पाहण्यासाठी : येथे क्लिक करा.
1 thought on “Soyabin Kapus anudan 2023: उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच कापूस सोयाबीन अनुदान मिळणार”