Soybean hamibhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन व उडीद हमीभावाने खरेदी होणार

Soybean hamibhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन व उडीद हमीभावाने खरेदी होणार मागील दोन दिवसापूर्वी सोयाबीनच्या भावात झालेलीव वाढ याबद्दलची माहिती आपण घेतली होती. परंतु आता नव्याने शासनाकडून सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आली आहे. यामध्ये सरकारकडून सोयाबीन साठी व उडीद पिकासाठी Soybean hamibhav  हमीभावाने खरेदी करण्यास परवानगी दिलेली आहे. ही हमीभावाने खरेदी पुढील तीन महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत  दिली आहे.

Soybean hamibhav  

सोयाबीन उडीद पीकांची होणार हमीभावाने खरेदी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्य शासनाने व कृषी विभागाने केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे या मान्यतेच्या मार्फत राज्यात सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीनला किमान 4892 रुपये प्रतिक्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे. ही खरेदी पुढील तीन महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत सांगितले आहे.

 

सोयाबीन आयात व निर्यात यावरील कार्यवाही प्रस्थाव

खाद्यतेल सोयामिल्क सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क लावून सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिक्विंटल किमान 50 डॉलर इतके अनुदान देण्यात यावे, अशी मागणी कृषी विभागाकडून तसेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. याबद्दल केंद्र सरकार ने  सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याबद्दलचा अधिकचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवराज सिंग चव्हाण यांचे मानले आभार

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची स्वागत करत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.

शेतकऱ्यांना किती भाव मिळणार

शेतकऱ्यांना नाफेड (NAFED) अंतर्गत सोयाबीन पिकाला हमीभाव देण्यात येणार आहे हा हमीभाव शेतकऱ्यांना सोयाबीन साठी प्रतिक्विंटल 4892 रुपये या प्रमाणात मिळणार आहे.

Soybean hamibhav  हमीभावाने किती दिवस खरेदी सुरू राहणार

राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व उडीद या पिकांची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे यामध्ये पुढील नऊ दिवसापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना आपले सोयाबीन व उडीद या पिकांची नाफेड कडे विक्री करता येणार आहे. पुढील तीन महिने शेतकऱ्यांना आपले पीक नाफेड कडे हमीभावाने विक्री करता येणार आहे.

हमीभावाचा शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा

राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरात चढउतार नेहमीच पाहायला मिळतो त्यामुळेच शासनाकडून शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे ज्याच्या मार्फत शेतकऱ्यांच्या पिकांची किंमत योग्य प्रमाणात ठेवून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची योग्य किंमत मिळणार आहे.

Soybean hamibhav twit

2 thoughts on “Soybean hamibhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोयाबीन व उडीद हमीभावाने खरेदी होणार”

Leave a comment