ssc,hsc result 2025 : मागील शैक्षणिक वर्षांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील लवकरच घेण्यात आल्या होत्या. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच आस लागते ती म्हणजे निकाल कधी लागणार. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान घेण्यात आल्या होत्या. दहावीचे परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यातील अनेक विभागातील उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण होत आले आहे.

परीक्षा लवकर पूर्ण झाल्याने निकाल देखील लवकरच लागतील असे महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने प्रसिद्ध केले होते. राज्यातील जवळपास सर्वच उत्तर पत्रिका तपासणीचे काम संपत आलेले आहे. यानुसारच लवकरच आता निकालाचे काम सुरू केले जाईल. अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून देण्यात आली आहे. पुढील अभ्यासक्रमासाठी जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे निकाल हा मे महिन्यातच लावला जाईल असे देखील स्टेट बोर्ड महाराष्ट्र यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हे वाचा : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम निवड प्रक्रिया , नियम व अटी.
निकालाची अधिकृत तारीख ssc
निकाल मे महिन्यात (ssc,hsc result 2025) लावणार असल्याची माहिती जरी दिली असली तरी अद्याप पर्यंत तारीख फिक्स सांगण्यात आलेले नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बोर्डाकडून तारीख जाहीर केली जाईल. बोर्डाने दिलेल्या माहितीप्रमाणे निकाल हा मे महिन्यातच लावला जाईल. तर सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. त्यासोबतच दहावीचा निकाल 17 ते 18 मे रोजी जाहीर केला जाईल अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. बोर्डाकडून अधिकृतपणे अजून तारीख जाहीर केलेली नाही. परंतु पूर्वतयारीच्या आधारे 15 मे 2025 रोजी बारावीचा निकाल व 17 किंवा 18 मे 2025 रोजी दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाऊ शकतो.