surya mitra training program :महाराष्ट्र संशोधन पद्धती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत संस्थेच्या ललित लक्षित गटातील उमेदवारांसाठी मोफत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सूर्यमित्र प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलर पॅनल उभारणी, देखभाल आणि दुरुस्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे ठिकाण आणि कालावधी
surya mitra training program प्रशिक्षणाचे पहिले ठिकाण छत्रपती संभाजीनगर आहे. या ठिकाणी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.तसेच ,
प्रशिक्षणाचे दुसरे ठिकाण हे लातूर आहे या ठिकाणी इच्छुक असणारे उमेदवार सहभागी होऊ शकतात .
- छत्रपती संभाजीनगर केंद्र:
- प्रशिक्षणार्थी संख्या: 40
- अर्ज करू शकणारे जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव
- लातूर केंद्र:
- प्रशिक्षणार्थी संख्या: 40
- अर्ज करू शकणारे जिल्हे: लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली
प्रशिक्षणाचा कालावधी 7 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 असा 18 दिवसांचा असेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2025 असून मुलाखतीची तारीख 2 जानेवारी 2025 आहे.
surya mitra training program किमान पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रता:
- किमान बारावी पास किंवा दहावी व तांत्रिक शिक्षण असलेले उमेदवार प्राधान्याच्या पात्रतेत येतील.
- वयोमर्यादा:
- 21 ते 50 वर्षे.
- कागदपत्रे:
- शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रक
- आधार कार्ड व पॅन कार्ड
- रहिवासी, जात, उत्पन्न दाखले
किमान पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा:
- प्रवीण डोके: 8830224979
- अमोल दिवेकर: 9527077586
तसेच, अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करून किंवा एमसीडीच्या संबंधित जिल्हा कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन येथे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 1 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज जमा करावा.
हे वाचा. महायुतीचं ठरलं ! गृह, महसूल, पर्यटन ते महसूल, नगरविकास…; कोणाला कोणती खाती