Sushil karad बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या निघृण हत्या प्रकरणी संबंधित खंडणीच्या आरोपांमुळे सीबीआयच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड आता आणखी एका गुन्ह्यात अडचणीत आला आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या एका तक्रार अर्जामुळे सुशील कराडविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Sushil karad तक्रारीचा आरोप:
- तक्रारदाराने सुशील वाल्मीक कराडवर बंदुकीच्या धाकावर संपत्ती लुटल्याचा आरोप केला आहे.
- सुशीलने वाल्मीक कराडने 2 ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट तसेच काही सोनं जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- मारहाण करत बंदुकीच्या धाकावर संपत्ती ताब्यात घेतल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण
Sushil karad मूळ सोलापूरची असलेली तक्रारदार व्यक्ती सुशील वाल्मिक कराड याच्याकडे मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशील कराडने आपल्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. आपले दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार त्याने केली आहे. तक्रारदार व्यक्तीची वैयक्तिक संपत्ती ही आपली संपत्ती आहे, असा आरोप करत सुशील कराडने बंदुकीच्या धाकाने दमदाटी केली, मारहाण केली आणि आपली वैयक्तिक संपत्ती ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदाराने बीड आणि सोलापूर पोलिसांवरही आरोप केले आहेत. तक्रार अर्ज करुनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सोलापूर कोर्टात दाद मागत असल्याचं त्याने म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यातच यासंबंधी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सोलापूर कोर्टात सुनावणी सुरु आहे, मात्र अद्याप पर्यन्त निर्णय झालेला नाही, पोलिसांनी या प्रकरणात सुशील आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंद करावा, चौकशी करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
हे वाचा: पत्रकार परिषद घेतली तर खासदारांची चड्डी जाग्यावर राहणार नाही
पोलिस प्रशासनावर देखील आरोप:
तक्रारदाराने सोलापूर आणि बीड पोलिसांवर तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अखेर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात तक्रार दाखल निर्णय घेतला व सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालय तक्रार सादर करण्यात आली आहे.
तक्रार दाराच्या वकिलांची भूमिका:
तक्रारदाराच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार:
- सुशील कराडसोबत आणखी दोन जनावर अनिल मुंडे आणि गोविंद गुंजेवार यांच्यावरही आरोप केले आहेत.
- तक्रारदाराच्या पतीकडे असलेल्या संपत्तीवरून सुशील नेहमी दबाव टाकत होता आणि मारहाण करत होता.
- सोलापूर MIDC पोलीस ठाणे आणि सोलापूर CP ऑफिसने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली.
Sushil karad कोर्टातील कारवाई
ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल झाल्यापासून सोलापूर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही. तक्रारदाराने गुन्हा नोंदवून चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुशील कराडवरील या नव्या आरोपांमुळे बीड जिल्ह्यातील प्रकरण अधिकच गंभीर होत आहे. कोर्टाचा निकाल आणि पुढील तपास यावर या प्रकरणाचे भविष्य अवलंबून राहणार आहे.