Milking Machine Price – दुध काढणी यंत्र

milking machine

दुध काढणी यंत्र. Milking Machine Price

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज दुग्ध व्यवसायासाठी महत्त्वाचे असणारे मशीन म्हणजे दूध काढणी यंत्र याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. खरंच  बघितलं तर भारत देश हा जगात दूध उत्पादनासाठी प्रथम स्थानावर आहे परंतु बाहेरील देशातील जेवढे तंत्रज्ञानचा वापर केला जातो तेवढा तंत्रज्ञानाचा  भारततात दुग्ध व्यवसायासाठी वापरले जात नाही.दुग्ध व्यवसाय हा आधी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून संबोधला जायचा परंतु आज मागणी वाढल्याने आजच्या  काळात दुग्ध व्यवसाय एक प्रमुख व्यवसाय बनला आहे.या व्यवसायातून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती केली आहे.या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपल्या उत्पादनात दहा ते वीस टक्के पर्यंत वाढ नक्कीच होईल.

दुध काढणी यंत्र

मागील काही वर्षापासून नवीन तंत्रज्ञाचा  वापर करून दुग्ध व्यवसायिकांनी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळवले आहे.भारतात गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या समूहाकडून दूध काढणी यंत्राची निर्मिती केली जाते. याच्या किमतीहि  शेतकऱ्यांना परवडण्या सारख्या  आहेत.

दुध काढणी यंत्राचे फायदे. 

आपण जर पाहिले तर हाताने धार काढण्यास शेतकऱ्यांचा जास्त वेळ जातो. जर अपणाकडे जास्त प्रमाणात जनावरे असतील तर आपणास मजुरांवर अवलंबून राहावे लागते. जर आपल्या जवळ Milking Machine दूध काढणी यंत्र असेल तर आपणास जास्त वेळ लागणार नाही आणि घरातील कोणतीही व्यक्ती या मशीन च्या साह्याने धार काढू शकतो.

मजुरांवरील खर्च कमी होऊन आपल्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण देखील वाढते.

जनावराच्या कासेला इजा होत नाही. वेळ कमी लागल्यामुळे जनावरे पान्हा मारत नाहीत. एकच वेळी चार ही सडा मधुन दूध निघते दुधाचे दर्जा चांगला मिळतो. मशीन चा वापर केल्यास कासेला लागलेली घान दुधात मिसळत नाही व आपल्या दुधाची गुणवत्ता उच्च प्रतीची मिळते.मशीन चा वापर केल्यास आपणास 10ते 20% उत्पन्न सुद्धा  जास्त मिळते.

दुध काढणी यंत्राचा वापर 

दूध काढणी यंत्र हाताळणे अगदी सोप्या पद्धतीचे आहे. नवीन नवीन आपणास हे मशीन वापण्यास अडचनी येऊ शकतात.परंतु योग्य प्रशिक्षण घेऊन आपण सहजरित्या या मशीनचा वापर करू शकतो. तसेच आपण ज्या कंपनीची मशीन घेतो त्यांच्या कडून सुद्धा  आपणास प्रशिक्षण दिले जाते.

दुध काढणी यंत्राच्या किमती 

दूध काढणी यंत्रामध्ये यंत्रामध्ये

१)  सिंगल बकेट दूध काढणी यंत्र

२) डबल बकेट दूध काढणी यंत्र

३) फोर बकेट दूध काढणी यंत्र

४)सिक्स बकेट दूध काढणी यंत्र

असे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्या प्रकारानुसार त्यांच्या किमती ठरवलेल्या असतात.

 

 

SINGLE BUCKET

Read more