Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदान, लवकरच मिळणार निधी; जीआर आला

Thibak Anudan : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सिंचन सुविधा उपलब्ध केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होणार असून ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान वितरित केले जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जाहीर करण्यात आला असून, शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

Thibak Anudan

Thibak Anudan योजनाची सुरुवात आणि विस्तार

राज्यात अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात आली होती. या योजनेस 19 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय नुसार मान्यता देण्यात आली. त्यानंतर, 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या निर्णय निर्णयानुसार राज्यातील इतर तालुक्यांमध्येही ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे वाचा : कांदा, हळद ,केळी आणि कापूस ,सोयाबीन, जाणून घ्या आजचे बाजार भाव

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

Thibak Anudan आर्थिक तरतूद

सन 2024 -25 या आर्थिक वर्षात या योजनेसाठी एकूण 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीचे वितरण पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे:

  • सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान: 300 कोटी रुपये
  • वैयक्तिक शेततळ्यासाठी: 100 कोटी रुपये

Thibak Anudan निधी वितरण आणि प्राधान्य

कृषी आयुक्तालयाने सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदानाकरिता निधी मागणी केली होती. त्यानुसार, शासनाने 16 मे 2024 रोजीच्या निर्णयानुसार 144 कोटी रुपये वितरित करण्याची परवानगी दिली आहे.

महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान

लाभार्थी निवड व अनुदान मंजुरी प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीद्वारे पार पडणार आहे. लाभार्थींच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

Thibak Anudan शेतकऱ्यांसाठी फायदे

  • सिंचनासाठी शाश्वत पाणीपुरवठा
  • शेती उत्पादनात वाढ
  • कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करण्याची सुविधा

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा. शासनाच्या या पुढाकारामुळे शेती उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.Thibak Anudan

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

Leave a comment