Thibak Sinchan Anudan: शेतकऱ्यांना आता ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान.

Thibak Sinchan Anudan : केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. तर आज आपण असीच एक योजना पाहणार आहोत जी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे .केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सिंचन समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन अनुदानात वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल.या साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ठिबक आणि तुषार सिंचनासाठी वाढीव अनुदान

ठिबक आणि तुषार सिंचनासाठी या अगोदर म्हणजेच 2017 च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान ठिबक व तुषार सिंचनासाठी दिले जात होते. आणि जमीन धारण मर्यादा जास्तीत जास्त 5 हेक्टर एवढी होती.

आता हे अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना 80 टक्के मिळणार आहे म्हणजेच पूर्वीच्या 55 टक्के अनुदान व्यतिरिक्त 25% अनुदान व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान मिळणार आहे. आणि इतर शेतकरी बांधवांना 45% टक्के अनुदाना व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान मिळणार आहे म्हणजेच हे अनुदान आता 75 टक्के इतके असणार आहे आणि या अनुदानासाठी कमीत कमी पाच हेक्टर क्षेत्र मर्यादा असणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आली आहे.Thibak Sinchan Anudan

हे वाचा : महायुतीच्या विजयाने महिलांसाठी आनंददायी घोषणा: लाडकी बहीण योजना २१०० रुपये कधीपासून मिळणार? पहा सविस्तर माहिती

कमी पाण्यात अधिक उत्पादनाचा फायदा

ठिबक व तुषार सिंचनामुळे खडकाळ भागातील शेतकऱ्यांनाही सिंचनाचा फायदा होतो. खडकाळ भागामध्ये विहिर आणि बोरला कमी पाणी असते त्यामुळे अशा वेळा ठिबक आणि तुषार सिंचनाचा उपयोग करून कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेता येऊ शकते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कमी पाण्यामध्ये ठिबक व सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी महाडीबीटी या पोर्टल वर अर्ज करावा लागणार आहे अर्ज कसा करायचा याबद्दल खालील प्रमाणे माहिती दिलेली आहे .

Thibak Sinchan Anudan ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

महाडीबीटी वेबपोर्टलवरून ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज करता येईल. अर्जासाठी खालील प्रक्रिया आहे:

  1. वेबसाइटला भेट द्या: Mahadbt Farmer Login
  2. लॉगिन किंवा नोंदणी: युजर आयडी व पासवर्ड तयार करून लॉगिन करा.
  3. अर्ज भरा: सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करून फॉर्म भरून जतन करा.
  4. प्राधान्य निवडा: अर्ज केलेल्या योजनांना प्राधान्य द्या.
  5. पेमेंट करा: डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI किंवा QR कोड वापरून पेमेंट करा.
  6. प्रिंट काढा: यशस्वी पेमेंट झाल्यावर प्रिंट काढून ठेवा.

Thibak Sinchan Anudan शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल

ठिबक व तुषार सिंचन अनुदानामुळे कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येईल. वाढीव अनुदान व सोपी ऑनलाइन प्रक्रिया यामुळे अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतील. यामुळे शेतीतील उत्पादकता वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.Thibak Sinchan Anudan.

Thibak Sinchan Anudan

Leave a comment

Close Visit Batmya360