Vidhan Sabha Voting Date 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे राज्यांमध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
हे वाचा: शेतकऱ्यांसाठी नवीन युनिक कार्ड आणणार
भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉक्टर सुखबीर सिंग संधू या सोबतच वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार, संजय कुमार आणि अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमाच्या या घोषणेने राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
Vidhan Sabha Voting Date 2024 हा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम :
Vidhan Sabha Voting Date 2024 महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे 22 ऑक्टोबर निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबरला अर्जाची पडताळणी होणार आहे अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत असेल 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होतील.
महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्राची माहिती :
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर ती मतदान होणार आहे यामधील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत राज्यांमध्ये एकूण 9.65 कोटी मतदार असून त्यापैकी 4.7 कोटी पुरुष आणि 4.6 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे राज्यात एकूण 126 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत यापैकी 42 हजार 6004 मतदान केंद्रीय शहरी भागात तर 57,582 मतदान केंद्रीय ग्रामीण भागात आहेत.
Vidhan Sabha Voting Date 2024 नांदेड केरळ आणि उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर :
Vidhan Sabha Voting Date 2024 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड मध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली यासोबतच केरळ मधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहेत तसेच उत्तराखंडातील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.
1 thought on “निवडणूक कार्यक्रम जाहीर या दिवशी होणार मतदान ; पहा काय आहे तारीख : Vidhan Sabha Voting Date 2024”