pm modi government : केंद्र सरकारकडून शेतकरी हिताच्या नेहमीच काही ना काही योजना व नियम आणले जातात. ज्याच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होऊन शेती विकास संपन्न होईल. या हेतूने केंद्र सरकार विविध योजना तसेच विविध नियम लावत असते. यातच आता सध्याच केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर केले. या हमीभावात मागील वर्षापेक्षा वाढ देखील करण्यात आली. आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी एक युनिक आयडी कार्ड अमलात आणणार आहे. हे कार्ड कसे असणार व याचा शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार याबद्दलची माहिती आपन पाहूया.
हे वाचा: रब्बी हंगामातील पिकाचे हमीभाव जाहीर.
कसे असणार नवीन युनिक आयडी कार्ड
जसे सध्या सर्वांसाठी आधार कार्ड आहे तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी एक युनिक आयडी कार्ड केंद्र सरकार तयार करणार आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती प्रदर्शित होईल ज्यामध्ये शेतकऱ्यांचे सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड त्यासोबतच शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या योजनांची माहिती आणि हवामान तपशील खतांचा तपशील जलसिंचनाचा तपशील वीज बिलाचा तपशील या सर्व गोष्टी या कार्डमध्ये समाविष्ट असतील.
pm modi शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का
pm modi सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवीन युनिक आयडी कार्ड तयार कधी जाणार आहे याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार का? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आहे आधीच शेतकऱ्यांकडे आधार कार्ड हे एक युनिक कार्ड असताना देखील शासन परत शेतकऱ्यांसाठी एक विशेष युनिक आयडी कार्ड का आणत आहे.
शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी विविध कागदपत्रे जमा करावी लागतात. परंतु या येणाऱ्या नवीन युनिक आयडी कार्ड मुळे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सर्व कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व तपशील व माहिती एकाच कार्डच्या माध्यमातून प्रदर्शित होईल ज्यामधून शेतकऱ्यांचे जमिनीचा तपशील आधार तपशील बँक खात्यात तपशील त्यासोबतच आवश्यक असणारी सर्व शेती संबंधी माहिती जसे की पिक विमा, शासकीय अनुदान ,शासकीय योजनांचा लाभ. अशा सर्व घटकांची माहिती एकाच कार्डवर उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही व कागदपत्रांच्या खर्चापासून शेतकऱ्यांची सुटका होईल.
या नवीन कार्ड मुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच त्यांचा कागदपत्रावर होणारा खर्च आणि वेळ दोन्ही देखील वाचणार आहे.
कधी मिळणार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना युनिक आयडी कार्ड
केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये (pm modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक) या प्रस्तावाला मान्यता दिली आहे या प्रस्तावाला मान्यता देऊन केंद्र सरकारकडून पुढील प्रक्रिया राबवून बाबत काही ठराविक राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात हा कार्यक्रम राबवला जाईल.
पहिल्या टप्याच्या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यात पाच राज्यांमध्ये शेतकऱ्यांना युनिक आयडी कार्ड वाटपाचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी शासनाकडून 10 ऑक्टोंबर पासून हा कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आणि याकरिता विशेष सिस्टम तयार न झाल्यामुळे युनिक आयडी कार्ड तयार करण्याची प्रक्रिया लांबवण्यात आली आहे. येत्या काही काळातच ही प्रक्रिया राबवण्यात येईल व शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी कार्ड वाटप केले जातील.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी नवीन युनिक कार्ड आणणार. pm modi”