Weather Update राज्यातील आजचा हवामान अंदाज, ढगांच्या गडगडा सह, काही ठिकाणी गारपिटीचा इशारा…

Weather Update : आज दोन एप्रिल राज्यातील हवामान निरीक्षणानुसार , अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तसेच पावसाची शक्यता आहे. काल एक एप्रिल रोजी कराड, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्याची नोंद आहे. तसेच 1 एप्रिल रोजी अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, जालना , धाराशिव आणि इतर काही भागांमध्ये रात्री ढगाळ वातावरण आणि थोडासा पाऊस झाला आहे.

राज्यातील वाऱ्याची स्थिती

राज्यातील अनेक भागांमध्ये दक्षिण व दक्षिण पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. तसेच या सोबतच, अति उंचावरून जाणारी पश्चिमी आवर्ताची ट्रफ सध्या राज्याच्या मध्यम व मराठवाडा पट्टयावर सक्रिय आहे . त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये गडगडाट तयार होत आहे . त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता (Weather Update) वाढली आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : सोने स्वस्त होणार… पहा काय आहे अर्थ तज्ञाचे मत..

जिल्ह्यातील ढगाळ वातावरण

2 एप्रिल म्हणजेच आज सकाळपासून काही भागात ढगाळ वातावरण आहे.यामध्ये अमरावती, बुलढाणा ,अकोला, हिंगोली ,वाशिम, परभणी, जालना, अहिल्यानगर ,बीड, सोलापूर जिल्ह्यातील उत्तरेकडील भाग तसेच पुण्याचा पूर्व भाग, सातारा जिल्हा, तसेच रत्नागिरी, नाशिक, धुळे, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भातील काही भागांमध्ये म्हणजेच गडचिरोली,नागपूर,चंद्रपूर आणि यवतमाळ या भागामध्ये ढगाळ हवामान दिसून आली आहे .Weather Update

गारपिटीचा इशारा

तापमानात वाढ झाल्यानंतर तयार होणारे ढगामुळे आज सायंकाळी राज्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे . शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची योग्य ती काळजी घ्यावी,असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे .पुढील काही तासाभरामध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे .त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .Weather Update

आज काही भागांमध्ये गारपीटीची आणि पावसाची शक्यता

आज सायंकाळी हवामान अंदाजानुसार काही भागांमध्ये गडगडाटसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . चंद्रपूर नांदेड यवतमाळ परभणी बीड (पूर्व) हिंगोली अमरावती वाशिम अकोला वर्धा नागपूर पट्टयात ढगांच्या गडगडाटसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता जास्त आहे .

तसेच कोल्हापूर भागामध्ये,आणि सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे अहिल्यानगर या काही भागांमध्ये पण मेघगर्जना सह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे .नाशिक धुळे या पट्टयातही गडगडाटसह पाऊस आणि गारपीट होण्याची कमी प्रमाणात शक्यता आहे .

इतर तालुक्यामधील गारपिटीचा धोका

राज्यातील काही अन्य तालुक्यांमध्ये गारपीट होण्याची कमी प्रमाणात शक्यता आहे . यामध्ये पैठण,बदनापूर,भोकरदन,जाफराबादया काही ठिकाणी गारपीट होण्याची कमी शक्यता आहे,पण या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. Weather Update

शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आव्हान

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार,शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेतली पाहिजे, शेतकऱ्यांनी गारपीट आणि पावसापासून संरक्षणकरण्यासाठी उपाय योजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे .विशेषता म्हणजे: गहू ,कांदा आणि फळ आणि भाज्या इतर पीक घेणाऱ्यांना या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे . Weather Update

Leave a comment