10 hp sour krushi pump: आता 10 एचपी सौर कृषि पंप बसवता येणार.. कृषि पंप बाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

10 hp sour krushi pump : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी राज्यांमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात मंजुरी दिली. या योजनेमध्ये आता सरकारकडून मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना आता दहा एचपी पर्यंत सौर कृषी पंप बसवण्यास मान्यता देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी भूजल पातळी कमी आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना दहा एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप बसवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने. राज्य शासनाने राज्यात दहा लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्याची व्यवस्था निर्माण केली. या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप वाटप देखील करण्यात आलेले आहे. जमीन क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी या मर्यादेत सौर कृषी पंप वितरित केले गेले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
10 hp sour krushi pump

नविन नियम काय? 10 hp sour krushi pump

10 एचपी सौर कृषी पंप बाबत राज्य शासनाने परवानगी दिली आहे. पण या नवीन नियमांमध्ये काही अटींचा समावेश करण्यात आलेला आहे. या अटी देखील समजून घेणे महत्त्वाचे असणार आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना फक्त साडेसात एचपी क्षमतेच्या पंप साठीच अनुदान दिले जाईल त्यावरील रक्कम शेतकऱ्यांना स्वतः स्वखर्चाने भरावी लागेल.

योजनेसाठी पात्रता

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत जे शेतकरी पात्र त्याच पद्धतीत या शेतकऱ्यांना देखील लाभ व्यतिरिक्त केला जाणार आहे. शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्त्रोत त्यामध्ये विहीर,बोरवेल, शेततळे, बारमाही नदी, नाला. या प्रकारचे साधन उपलब्ध असणे आवश्यक आहे. महावितरण कडून त्या क्षेत्रातील पाण्याची उपलब्धता तपासली जाईल. ज्या शेतकऱ्याला चौकशी पंप योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याने यादी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना यापैकी कोणत्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया

10 एचपी सौर कृषि पंप योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी देखील आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नवीन अर्ज भरताना आवश्यक लागणारी माहिती यामध्ये शेत जमिनीची माहिती बँकेची माहिती शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती ही सर्व माहिती भरून अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे भरावे लागतील.

त्यानंतर आपल्याला 10 एचपी पंप साठी अर्ज करायचा असल्यास आपली अर्जाची पोस्ट पावती घेऊन आपल्या जवळील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. महावितरण उपविभागीय कार्यालयाकडून आपल्याला 10 एचपी पंप साठी आवश्यक असणारी पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मागेल त्याला सौर कृषि पंप योजना अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Sour krushi pump मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांना याआधी साडेसात एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप वाटप केले जात होते. या नवीन नियमानुसार राज्यातील शेतकऱ्यांना आता दहा एचपी पर्यंतचे सौर कृषी पंप आपल्या शेतात बसवता येतील. ज्या शेतकऱ्यांचे शेत्र जास्त आहे किंवा ज्या भागात पाण्याची पातळी अतिशय खोल आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना 10 एचपी पंप साठी साडेसात एचपी पंपचे जे अनुदान आहे ते अनुदान देखील वितरित केले जाणार आहे. शेतकऱ्यांना दहा एचपी पंप मिळवण्यासाठी फक्त वरील अडीच एचपी पंप साठी येणारा खर्च शेतकऱ्याला स्वतः उचलावा लागणार आहे.

शासनाच्या नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांना दहा एचपी कृषी सौर पंपाची आवश्यकता आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. आवश्यक आणि पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ घ्यावा.

Leave a comment