Weather Update: काही तासात महाराष्ट्रावर परत मोठं संकट, हवामानाचा अंदाज

Weather Update : मागील काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे , वादळी वारे, ढगांच्या कडकडाट सह, गारपीट झालेल्या या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरवूनघेतला आहे. अनेक दिवसापासून चाललेला हा पाऊस यामुळे उन्हाळी बाजरी, फळबाग आणि कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. दरम्यान आता परत एकदा पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्र राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असे हवामान सांगण्यात आले आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान शास्त्रज्ञ एस . डी . सानप यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.Weather Update

Weather Update

मान्सून अंदमान मध्ये दाखल

हवामान विभागाने असे सांगितले आहे की सध्या मान्सून अंदमान मध्ये दाखल झाला आहे. आणि तो 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमानमध्ये 8 ते 9 दिवसांनी अगोदरच मान्सूनचे आगमन झाले होते, यामुळे केरळमध्ये पण तीन ते चार दिवस अगोदरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे . परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून नेमका कधी येणार हे आता सांगण्यात येणार नाही, असं यावेळी सानप यांनी म्हटलं आहे.Weather Update

हे वाचा : जमिनीची हिस्से वाटप मोजणी आता फक्त 200 रुपयात, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पुन्हा एकदा राज्यात धो धो पाऊस

राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. याचे कारण, महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळे आणि आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस होत असून येत्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात विविध भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आली आहे. पुढच्या दोन दिवसात मराठवाड्या ढगांच्या कडकडाटसह मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क तेचा इशारा हवामान शास्त्रज्ञ सानप यांनी दिला आहे.Weather Update

अवकाळी पाऊस आला जोर आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दरम्यान मागील दोन ते तीन दिवसापासून नाशिक मध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, आज इगतपुरी तालुक्यात तब्बल 6 दिवस झालं अवकाळी पाऊस चालूच आहे . तसेच, ढगांच्या कडकडाट सह, व जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडला आहे. झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे, या तालुक्यातील 87 हेक्टर शेती अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी तसेच भाजीपाला , फळबाग उध्वस्त झाली आहेत. पण मात्र दुसरीकडे झालेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उखाड्यापासून दिलासा मिळाला आहे. Weather Update

Leave a comment