कापूस व सोयाबीन अनुदान : अनुदानचे लाभार्थी कोण आहेत, पहा ऑनलाईन यादी. आम्ही तुम्हाला आज आले का मध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे लाभार्थी कोण आहेत हे पाहण्यासाठी ऑनलाईन यादी कशी पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती पहा.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, ढगफुटी, गारपीट, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणामुळे तसेच झालेल्या किमतीतील घसरीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि याचे परिणाम शेतकऱ्यांना सोसावे लागते, मग अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2023 – 24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल याची घोषणा करण्यात आलेली आहे .
कापूस सोयाबीन अनुदान
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे अशी घोषणा शासनाने केली आहे . तसेच कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 4 हजार 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे . आणि अनुदान कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने यादी कशी पाहायची याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे. ती माहिती तुम्ही फॉलो करा.
कापूस/सोयाबीन अनुदान तारीख ठरली, या दिवशी जमा होणार रक्कम.
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट
कापूस व सोयाबीन उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्याकरिता या योजनेचे पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर पीक निहाय व गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी देण्यात आलेली आहे.
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी पाहण्याची पद्धत
- कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ओपन करा
https//uatscagridbt.mahaitgov.in/Farmert Login/Login - या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर farmer search या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर farmer लॉगिन मध्ये तुमचा आधार नंबर टाकून Get OTP Aadhaar Verification वर क्लिक करा.
- OTP टाकून व्हेरिफाय करायचा आहे. यानंतर राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल, यासाठी आपला विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडून सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- कापूस बस सोयाबीन अनुदान लाभार्थी यादीमध्ये शेतकऱ्यांना आपले नाव, सर्वे नंबर , खाते नंबर, पिकाचे नाव आणि क्षेत्र पाहायला मिळेल.
अशा पद्धतीने तुम्ही कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी पाहू शकता.