पीएम किसान FPO योजना ,शेतकऱ्यांना देण्यात येणार 15 लाख रुपयांची मदत, याबद्दल पहा सविस्तर माहिती

पीएम किसान FPO योजना केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. जेणेकरून अशा काही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच आज आपण एक नवीन योजना (Agriculture Schemes ) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी 15 लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान एफपीओ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना उत्पादक गटांना केंद्र सरकारकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा लाभ हा देशातील शेतकरी घेऊ शकतात जेणेकरून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उभा करण्यास मदत होईल. आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पीएम किसान FPO योजना प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना

प्रधानमंत्री किसान एफपीओ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान एफपीओ योजनेअंतर्गत 11 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करू शकतात. शासनाकडून या संघटनेला 15 लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. ही रक्कम शेतकरी उत्पादक संघटना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी वापरू शकतात.

हे पण वाचा:
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana :पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या हप्त्यासाठी नवीन अट! हे महत्त्वाचे डॉक्युमेंट नसेल तर मिळणार नाही 2000 रुपयांचा लाभ..!

शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ड्रोन; ऑनलाइन अर्ज सुरू.

प्रधानमंत्री किसान एफपीओ योजनेचे फायदे

  • या योजनेमुळे शेतकरी एकत्र येऊन काम करू शकतील.
  • तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.
  • शेतकरी उत्पादक संघटनांना आपले उत्पादन चांगल्या दरात विकण्यासाठी बाजारपेठ मिळेल.
  • या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करू शकतील.

या योजनेसाठी कोण करू शकेल अर्ज?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांच्या गटाने एकत्रित येऊन एक संघ किंवा एक संघटना तयार करावी लागेल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी संघटनेने आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतील .
  • या योजनेसाठी शेतकरी संघटना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पीएम किसान FPO योजना पात्रता आणि निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेले पात्रता आणि निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणे बंधनकारक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादन संघटनेचा (FPO) सदस्य असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी उत्पादक संघ म्हणजे, एफपीओ मध्ये कमीत कमी 11 शेतकरी असणे आवश्यक आहे.

पीएम किसान FPO योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • रेशन कार्ड
  • शेतकऱ्यांच्या आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • पत्ता आणि पत्त्याचा पुरावा
  • बँक खाते
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • सातबारा उतारा
    वरील दिलेली सर्व कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

पी एम किसान एफपीओ योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • पीएम किसान एफपीओ या योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे.
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम अपलाईन या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यावा लागेल.
  • आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे.
  • ओटीपी टाकून झाल्यानंतर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तेथे एफपीओ जे काही नियम अटी तरतुदी असतील त्या ठिकाणी करून घ्यायचे आहेत.
  • ही सर्व प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमची अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

हे पण वाचा:
PM E-Drive Scheme PM E-Drive Scheme: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना …आता फक्त 5 दिवसात मिळणार अनुदान! असा करा अर्ज…

Leave a comment

Close VISIT MN CORNERS