शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये कर्जमाफी. शेतकरी कर्ज माफी.

शेतकरी कर्ज माफी : राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. यातच विविध पक्षाकडून विविध घोषणा आश्वासन दिले जात आहेत. सर्वच पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीची जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल. यांनी सुद्धा शेतकरी कर्जमाफी करण्याबद्दलचे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना खरंच कर्ज माफी मिळणार का? किंवा कोणता पक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे प्रश्न शेतकऱ्यांचे मनात निर्माण होत आहेत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या सोबतच सत्ता धारी पक्षाने निवडणुकीआधीच कर्ज माफी का नाही दिली? असे विविध प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्या सोबतच जाहीरनाम्यात बोलल्याने शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळते का? या अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहुयात.

प्रत्येक वेळी निवडणुकीत विविध जाहिनामे प्रसिद्ध केले जातात. परंतु प्रत्येक वेळी किती प्रमाणात या घोषणांचे पालन होते हे आपण नेहमीच पाहिलेले आहे. प्रत्येक निवडणुकीत रोजगार निर्मिती हा मुद्दा असतोच तो सुटणार कधी, मग नेमकी कशी मिळेल शेतकऱ्यांना कर्जमाफी.

महाविकास आघाडीचा जाहीरनामा

  • राज्यातील शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करणार. शेतकरी कर्ज माफी
  • राज्यातील महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना वितरित करणार.
  • बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये प्रति महिना आर्थिक लाभ देणार.
  • नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणार.
  • आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करणार.
  • राज्यातील महिलांना मोफत बस प्रवास.

महायुती सरकारचा जाहीरनामा.

  • लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना 2100 रुपये प्रति महिना लाभ देणार.
  • महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात 25000 महिलांची पोलीस संरक्षण खात्यात भरती केली जाणार.
  • ग्रामीण भागात 45 हजार पानात रस्त्याच्या निर्मिती केली जाणार.
  • शेतकऱ्यांचे कर्ज माफ आणि शेती पिकाच्या एम एस पी वर 20 टक्के अनुदान दिले जाणार.
  • वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशे रुपये वरून 2100 रुपये लाभ केला जाणार.
  • दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये एवढे विद्यावेतन दिले जाणे.
  • 25 लाख तरुणांना नवीन रोजगार निर्मिती केली जाणार.
  • अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये एवढे वेतन दिले जाणार.
  • जीवनावश्यक वस्तूंच्य किमती स्थिर ठेवणार

हे वाचा: पहा कोणत्या पक्षाचे काय आहेत आश्वासणे

शेतकरी कर्ज माफी नक्कीच होणार

दोन्ही पक्षाच्या (युतीच्या) माध्यमातूनशेतकरी कर्ज माफी मुद्दा जोरावर धरलेला आहे. या मुद्द्याच्या अनुषंगाने खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? या केलेल्या घोषणांचे पालन केले जाईल का? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. परंतु दोन्ही बाजूने शेतकरी कर्ज माफी हा मुद्दा उचललेला दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. कारण कोणाची तर एकाची सत्ता येणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशी आशा गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना आता लागली आहे.

जाहीरनामा खरंच पाळला जातो का?

निवडणुकीदरम्यान प्रचार करताना पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो. या प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याचे संबंधित पक्षाला (सत्तेत आल्यास) सत्ताधाऱ्याला त्यांनी निवडणुकीत प्रसिद्ध केलेला जाहीरनामा पाळणे बंधनकारक असतं? किंवा निवडणूक झाल्यानंतर हे जाहीरनामा पाळतील का याबद्दल थोडी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया.


शेतकरी कर्ज माफी निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन होते आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर पक्षाकडून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याच वेळा ही आश्वासने सरकारकडून पूर्ण देखील केली जात नाही. परंतु निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीदरम्यान पक्षाने केलेली आश्वासने प्रसिद्ध केलेले जाहीरनामे यामधील कोणत्या घोषणा पूर्ण केल्या याची माहिती देणे आवश्यक असते. त्यासोबतच ज्या घटकावर सत्ताधारी पक्षाने कार्य केले नाही ते का केलं नाही याचे कारण देखील देणे बंधनकारक असते. हा नियम जरी असला तरी आजवर केलेले किती जाहिरनामे सरकार ने पाळले आहेत हे आपल्याला माहीतच आहे.

खरंच मिळेल का 3 लाख रुपये कर्ज माफी

वरील घेतलेल्या महितीतून एक गोष्ट लक्षात येते की जाहीरनाम्यात जरी घोषणा केली असेल. तरी पुढे ते कार्यवाही राबवायची किंवा नाही राबवायची किंवा हा लाभ नागरिकांना द्यायचा किंवा नाही द्यायचा हे पुर्ण अधिकार सत्ताधारी पक्षाच्या हातात असते. त्या सोबतच जाहीरनामा हा पाच वर्षात पूर्ण करावा लागतो, मग तो सरकर स्थापन झाले की लगेच निर्णय घेणार की पुढच्या निवडणूक जवळ आल्यावर निर्णय घेणार. कारण सरकार ने मंत्री मंडळात निर्णय घेतल्याशिवाय कोणताही निर्णय लागू होत नाही.

यामुळे आज आश्वासन देखील मिळत असेल तरी शेतकरी कर्ज माफी मिळेलच का याबद्दल शंका निर्माण होत आहे? ज्या दिवशी कर्जमाफी वर ठाम निर्णय होईल त्याच दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, आज कितीही कोणत्याही पक्षाने घोषणा केल्या तरी देखील शेतकऱ्यांना यातून कर्जमाफी देता येणे किंवा यातून कर्जमाफी मिळणं शक्य नाहीये.

Leave a comment

Close Visit Batmya360