अटल पेन्शन योजना नमस्कार बंधू-भगिनींनो, आपल्या सर्व देशवासियांना या योजनेची नितांत गरज आहे कारण वयाच्या 60 वर्षांनंतर त्यांचे कामाचे वय संपले आहे, अश्या माझ्या 60 वर्षांच्या भारतातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. आपल्या देशातील सर्व बंधू-भगिनी आपण साठ वर्षांचे होईपर्यंत काम करतात, खूप कष्ट करतात, पण वयाच्या ६० वर्षानंतर कोणतीही व्यक्ती थकते, त्याच्यात काम करण्याची ताकद नसते, पण सर्व नागरिकांना पेन्शन मिळायला हवी आणि आज आपना त्यांना पेन्शन कशी मिळेल या बद्दलची माहिती घेणार आहोत.
Table of Contents
Toggleउतरत्या वया मध्ये अटल पेन्शन योजनेचा नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार सर्व बंधू-भगिनींना १००० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंतचे पेन्शन देते. सरकार कडून ही पेन्शन योजना राबवण्यात येत आहे.
हे वाचा : अटल बांधकाम कामगार आवास योजना
भारत सरकार आणि केंद्र सरकारकडून आपल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत . वृद्धापकाळातील सर्व शहरवासीयांचा आधार ठरत असलेली ही एक योजना. अटल पेन्शन योजना त्यापैकीच एक योजना आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी अर्जदारांना काही नियमांचे पालन करावे लागते. संपूर्ण नियमांचे पालन केल्यावर वर दिलेल्या रकमेचा चांगला लाभ घेता येतो.
आज आमच्या लेखात दिलेली माहिती भारतातील सर्व नागरिकांना उपयोगी पडणार आहे.अटल पेन्शन योजना मध्ये आपल्या तरुण वयात आपन प्रती महिना गुंतवणूक करतो आपल्या वयानुसार गुंतवणूक रक्कम वेगवेगळी असते.गुंतवणूक रक्कम जरी वेगवेगळी असली तरी मिळणारी रक्कम आपण निवडलेल्या प्लान नुसार सर्वाना समान मिळते. रक्कम ही आपल्या वयाच्या 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. मिळणारी पेन्शन रक्कम ही आपल्याला प्रती महिना आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. पेन्शन योजनेची सर्व माहिती या लेखात आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजना 2024 ची संपूर्ण माहिती देत आहोत.
काय आहे अटल पेन्शन योजना ?
अटल पेन्शन योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2015 रोजी केला. १८ ते ४० वयोगटातील तरुणांनी या योजनेत गुंतवणूक करावी. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर त्यांना 60 वर्षांच्या नंतर संपूर्ण वयोगटासाठी मासिक पेन्शन आधार दिला जाईल.
दरमहा प्रीमियम भरावा लागतो. या प्रीमियमची रक्कम २०० रुपयांपासून १४०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेच्या माध्यमातून वयाच्या 60 वर्षानंतर त्यांना पेन्शन देण्यात येते.
अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट
या अटल पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश कर्मचारी आणि असंघटित क्षेत्राला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा पेन्शन देणे हा आहे. या योजनेतून सर्व लाभार्थी व सर्व पेन्शनधारकांना दरमहा 1000 ते 5000 रुपयांची रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येणार असून ही योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना महत्वाची योजना आहे.
अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे
- देशातील सर्व कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.
- अटल पेन्शन योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी कामगारांना प्राप्तिकर कायदा १९६० कायदा आणि कलम ८० सीसीडी अंतर्गत कर सवलत देण्यात येणार आहे.
- अटल पेन्शनच्या लाभार्थ्याला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा १०० ते ५००० रुपयांपर्यंत रक्कम दिली जाईल. या मिळालेल्या पेन्शनच्या मदतीने कर्मचारी पद्धतशीरपणे जीवन जगू शकतात.
- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना किमान २० वर्षे गुंतवणूक करावी लागणार असून, त्यानंतर ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
अटल पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- मूळ रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वयाचा दाखला
- जातीचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल नंबर अॅक्टिव्ह आहे
- बँक खात्याचे पासबुक
अटल पेन्शन योजनेचा अर्ज
- अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर दिलेल्या नियमांचे पालन करा .
- सर्वप्रथम, आपन अटल पेन्शन योजना च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा पॅन नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
- आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
- त्यानंतर तुम्हाला तुमची बँक निवडावी लागेल.
- आता बँक आणि अर्ज तुम्हाला पाठवला जाईल.
- या योजनेच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटचा पर्याय निवडावा लागेल.
- आता नवीन पॅन नंबर आणि अकाउंट नंबर टाका.
- आता यूपीआय पिन टाका
- त्याचप्रमाणे दरमहा २१० रुपयांपर्यंत प्रीमियम भरावा लागतो.
- शेवटी, सबमिट पर्यायावर क्लिक करा. .
- आता तुम्ही अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी झाला आहात.
निष्कर्ष
या लेखात आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे . तर मित्रांनो, आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि आमचा लेख चांगला वाटला असेल अशी आशा आहे. आता अश्याच वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या अधिकृत व्हॉटअप ग्रुप मध्ये जॉइन व्हा. आणि अशाच शासकीय योजनांची माहिती मिळवा.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “अटल पेन्शन योजना 2024 APY Scheme Detail”