ई पिक पाहणी यशस्वी झाली का असे तपासा
महाराष्ट्र शासनाने व राज्य महसूल विभागाने आयोजित केलेले डिजिटल क्रोप सर्व्हे अंतर्गत ई पीक पाहणी ही मागील चार ते पाच वर्षापासून राज्यात राबवण्यात येते. परंतु यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये ई- पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान रक्कम वितरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ई पीक पाहणी किती महत्त्वाची आहे हे नव्याने शेतकऱ्यांना सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांची ई पिक पाहणी यशस्वीरित्या सबमीट झाली आहे किंवा नाही हे कसे पहायचे हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण केलेली ई पीक पाहणी यशस्वी झाली कि नाही कशी तपासायची याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
ॲपच्या माध्यमातून तपासा
महाराष्ट्र राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेली ई- पिक पाहणी ॲप ज्याच्या माध्यमातून आपण पिकांची ऑनलाइन पद्धतीने सातबारे वर नोंद करतो. त्या ॲपमध्ये आपण केलेल्या ई-पिक पाहणीचे सद्यस्थिती व यशस्वी झाली किंवा नाही हे या ठिकाणी पाहू शकता. आपण आपल्या मोबाईल मध्ये ॲप उघडल्यानंतर त्या ठिकाणी गावांची यादी हा पर्याय आपल्याला दिसेल. त्या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण गावाची यादी दिसेल या यादीमध्ये सर्व गावातील खातेदारांची नावे दिसतील. आणि ज्यांची ई पीक पाहणी यशस्वीरित्या सबमिट झाली आहे अशा शेतकऱ्यांची नावे ग्रीन(हिरव्या) पट्टीमध्ये दिसतील ज्या शेतकऱ्यांचे ग्रीन पट्टीमध्ये नाव आले आहे त्यांनी त्यासमोरील डोळ्या सारख्या चिन्हावर क्लिक करून आपली ई पिक पाहणी आपण कोणती माहिती भरली आहे याची तपासणी त्या ठिकाणी करू शकता ज्या शेतकऱ्यांची ई पिक पाहणी यशस्वी झाली आहे त्या शेतकऱ्यांचे हिरव्या पट्टीमध्ये नाव येते आणि ज्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या पट्टीमद्धे येत नाही त्याची ई पिक पाहणी झालेली नाही. या प्रमाणे आपण आपली ई पिक पाहणी झाली किंवा नाही हे अॅप च्या माध्यमातून तपासू शकता.
वेबसाईटवर असे तपासा
शासनाची अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला उजव्या साईटला ई-पिक पाहणी हा टॅब दिसेल त्या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपण ई पीक पाहणी अहवाल या टॅबवर पोहोचाल येथे गेल्यानंतर आपल्याला हंगाम त्यानंतर आपला विभाग, त्यानंतर आपला जिल्हा, आपला तालुका, आणि आपले गाव अशा प्रमाणात माहिती निवडावे लागेल त्यानंतर ई पाहणी अहवाल या पर्यायांवर क्लिक करा हे निवडल्यानंतर आपल्यासमोर आपल्या गावाचे ज्या खातेदारांची ई पिक पाहणी यशस्वी झाली आहे त्या खातेदारांची नावे या ठिकाणी दिसतील. यामध्ये अनुक्रमांक, खातेदारांचे नाव, खातेदारांचा खाते क्रमांक, गट क्रमांक, त्यानंतर ई-पिक पाहणी केलेली दिनांक व वेळ त्यानंतर, पिकांचा प्रकार आणि पिकांचे क्षेत्र अशा प्रमाणात संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल.
जर या ठिकाणी आपले नाव नसेल तर आपण आपली ई-पिक पाहणी यशस्वी झाली नाही असे समजण्यात येते. आणि आपण आपली ई पिक पाहणी अॅप च्या माध्यमातून नोंदवणे आवश्यक आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “ई पिक पाहणी यशस्वी झाली का असे तपासा”