कापूस सोयाबीन अनुदान 2023 KYC कशी होते पहा
कापूस सोयाबीन अनुदान kyc: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस या पिकासाठी शासनाकडून अनुदानित करण्यात आले या अनुदानाबद्दल जे काय नियम व जीआर प्रसिद्ध झाले याबद्दलची संपूर्ण माहिती आपण मागील पोस्टमध्ये पाहिलेली आहे या पोस्टमध्ये या अनुदानांतर्गत ज्या शेतकऱ्यांना KYC करणे आवश्यक आहे ही केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने होते व केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे कधी वितरित केले जाणार केवायसी साठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्र द्यावी लागणार तसेच यासाठी शेतकऱ्यांनी काय करणे आवश्यक आहे. याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
Table of Contents
Toggleटीप: खरीप 2023 कापूस सोयाबीन अनुदान kyc ही आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र तसेच सेतु सुविधा केंद्र या मध्ये ही kyc करता येत नाही तसेच शेतकऱ्यांना स्वतः सुद्धा ही kyc करता येत नाही ही kyc फक्त कृषि विभाग अंतर्गत केली जाणार आहे. आपल्याला नेमलेले कृषि अधिकारी यांना या kyc करण्याची जबाबदारी दिलेले आहे आणि त्यांच्या मार्फत ही अनुदान kyc केली जाणार.
कोणाला मिळणार अनुदान
शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली याबद्दलचा जीआर ही शासनाने प्रसिद्ध केला परंतु या जीआरमध्ये ईपीक पाहणी केल शेतकऱ्यांनाच अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलं परंतु नंतर याद्या प्रसिद्ध झाल्या त्या यादीमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी एपिक पाहणी करून देखील त्यांचे नाव यादीमध्ये उपलब्ध नव्हते म्हणून शासनाने पीक पाणी घेतल्या शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकाची नोंद आहे कापूस किंवा सोयाबीन त्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतचा दुसरा जीआर प्रसिद्ध केला या जीआर च्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये आपल्या कापूस व सोयाबीन या पिकाची ईपीक पाहणी करून पिकाची नोंद आपल्या सातबारे वर केली आहे अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार
कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ उपलब्ध
कापूस सोयाबीन अनुदान kyc कुठे होते
कापूस सोयाबीन अनुदान kyc अनुदानासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून सहमती पत्र व आधार कार्डची झेरॉक्स हे कागदपत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे देण्याबाबतच्या सूचना दिल्या यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपले सहमती पत्र व आधार कार्ड कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केले आहे या शेतकऱ्यांची कृषी सहाय्यक यांच्याकडूनच केवायसी केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आधारसमती पत्र किंवा आपल्या आधार कार्डची झेरॉक्स जमा केले नाही अशा शेतकऱ्यांची केवायसी कृषी सहाय्यक यांना करता येणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपले सहमती पत्र व आधार कार्ड जमा केले नाही त्यांनी आपल्या कृषी सहायकाकडे आपले कागदपत्रे जमा करावे
कापूस सोयाबीन अनुदान kyc कशी होते
सोयाबीन कापूस अनुदानासाठी कृषी साहेब यांना शासनाने निर्गमित केलेल्या पोर्टलवर युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आले आहे या योजनेसाठी पासवर्ड च्या माध्यमातून कृषी सहाय्यक यांच्या अधिकाऱ्यातील सर्व गावासाठी ही एक आयडी तयार करण्यात आली त्या आयडीवर त्यांच्या अधिकारात येणाऱ्या सर्व गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे त्या ठिकाणी प्रदर्शित होतात या नावाच्या समोर कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतकऱ्याकडून घेतलेली सहमती पत्र व आधार कार्ड याच्या आधारे शेतकऱ्यांचा आधार नंबर शेतकऱ्यांचा आधार प्रमाणे नाव व शेतकऱ्याचे मोबाईल नंबर या सर्व गोष्टी पोर्टलवर व्यवस्थित भरून शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली जाते
शेतकऱ्यांना केवायसी केंद्रावर करता येते का
कापूस सोयाबीन अनुदानासाठी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान kyc अशी करणे आवश्यक आहे ही केवायसी मागील अनुदानाप्रमाणे नसून यामध्ये कृषी सहाय्यक यांनाच अधिकार देण्यात आला आहे आपण माही सेवा केंद्र किंवा सीएससी सेवा केंद्र या ठिकाणी आपल्या अनुदानाची केवायसी करू शकत नाही आपली केवायसी ही फक्त कृषी सहाय्यक यांच्या लॉगिन वरूनच होणार आहे
अनुदान कधी मिळणार
शेतकऱ्यांनी आपले सहमती पत्र व आधार कार्ड कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केल्यानंतर कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली जाईल ही केवायसी पूर्ण केल्यानंतर म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे त्या शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर च्या नंतर निधी वितरीत केला जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी पुणे बाकी आहे किंवा केवायसी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी रक्कम मिळणार नाही या शेतकऱ्यांची ज्याप्रमाणे केवायसी होतील त्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर निधी वर्ग केला जाईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
Anudan 5000