महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजने विषयी माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना यंत्र घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. चला तर आपण आज या योजनेमध्ये यंत्र घेण्यासाठी किती अनुदान दिले जाणार आहे, कोण कोणते यंत्र खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे, याचे फायदे, यासाठी कोण कोण पात्रता असेल, यंत्र खरेदीसाठी आवश्यक लागणारे कागदपत्र,अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्वाची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.
Table of Contents
Toggleमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव म्हणजे कृषी यांत्रिकरण योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी 80 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. पण अगोदर शेतकरी ही शेती पारंपरिक पद्धतीने करत होते .आणि सध्याच्या काळामध्ये तर शेती करण्यासाठी लागणारे मंजूर कमी असल्यामुळे सध्या च्या काळामध्ये जास्तीत जास्त यांत्रिकीकरणाचा उपयोग केला जातो.
पण हे यंत्र खरेदी करण्याची सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती नसते . मग त्या शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करण्यासाठी मंजूर लावावे लागते. पण सध्या तर मजूर मिळत नाही आणि वाढलेला रोजगार. या सर्व संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
अशा शेतकऱ्यांचा राज्य सरकारने विचार केला आणि कृषी यांत्रिकीकरण ही योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे जेणेकरून त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही. असा या योजनेमागचा उद्देश आहे.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण ही योजना कृषी विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या लागणारी सर्व औजारे उदा. ट्रॅक्टर,पॉवर टीलर व इतर औजारांसाठी लाभ घेता येईल . कृषी यांत्रिकीकरण योजना हि केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 40% आणि राज्य शासनाचा 60% सहभाग आहे.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना माहिती
महाराष्ट्र कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये यंत्र खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना 80 टक्के पर्यंत अवजार खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येणार तसेच या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि महिला उमेदवारांसाठी एकूण 50% अनुदान शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.तसेच इतर शेतकऱ्यांसाठी 40% या योजनेचा लाभ दिला जाणार आणि या सर्व अनुदानासाठी GST उपलब्ध या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उपयुक्त उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांना हे अवजारे खरेदी करणे अत्यंत सोपे व्हावे म्हणून राज्य सरकारने शेती अवजारे खरेदी करण्यासाठी 80 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांना शेती काम करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून वेळेची बचत होईल आणि शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल .
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना उद्देश
- कृषी यांत्रिकीकरण या योजनेची सुरुवात शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी आर्थिक अडचणीचा सामना करू लागू नये म्हणून करण्यात आली आहे.
- कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देणे
- शेती मधले काम पटकन व्हावे व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होवी या उद्देशाने कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात आलेली आहे
- कृषी यांत्रिकीकरण या योजनेमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या श्रीमंत होणार आहे व त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेच्या माध्यमातून खूप सारे कृषी उपकरणावर अनुदान दिले जाणार आहे जेणेकरून शेतकरी शेती उपयुक्त उपकरणे खरेदी करू शकतील आणि शेतीतले सर्व कामे जलद गतीने करू शकतील व स्वतःच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल.
- कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खाता DBT च्या साह्याने जमा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
- कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40% सहभाग आहे.
- कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदानासाठी GST रक्कम गृहीत धरण्यात येत नाही.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचे लाभार्थी
- या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील , महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान
- शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 80% अनुदान देण्यात येईल.
कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत दिले जाणारे यंत्र
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे
- मनुष्य चलित यंत्र /अवजारे
- प्रक्रिया संच
- पलोउत्पादक यंत्र/अवजारे
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयं चलित यंत्रे
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना फायदा
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
- शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध प्रकारच्या अवजारांसाठी अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत गरीब व गरजाळू शेतकऱ्यांना शेतातील कामे वेळेवर पूर्ण होऊन लाभ मिळणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला मोठी गती मिळणार आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना आता शेतामध्ये जास्त कष्ट घेण्याची गरज पडणार नाही.
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे झालेले आहेत. यामुळे शेतीच्या कामांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादनात वाढ झालेली आहे.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता
- या योजनेचे पात्रता महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असावा व त्याच्या नावावर स्वतःची शेती असावी.
- या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, या सर्व प्रवर्गातील लोक देखील अर्ज करू शकतात पण त्यांना जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्ग लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अवजारे खरेदी केल्यानंतर किमान सहा वर्ष शेतकऱ्यांनी वापरणे गरजेचे आहे. सहा वर्षानंतर ही अवजारे शेतकऱ्यांना दुसरे कोणाला तरी हस्तांतर करता येतील किंवा विक्री करता येतील किंवा घाण ठेवता येतील .
- ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार अशा एकाच यंत्रासाठी या योजनेअंतर्गत अनुदान घेऊ शकतात.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी एखाद्या यंत्रासाठी अर्ज करून यंत्र खरेदी केलेले असेल तर, किमान त्या शेतकऱ्याला दहा वर्षासाठी त्या अवजारासाठी अर्ज करता येणार नाही परंतु या काळात शेतकऱ्याला दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई – मेल आयडी
- जातीचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- जमिनीचा सातबारा व 8 अ
- यंत्र /अवजारांचे कोटेशन
- परीक्षण अहवाल
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- प्रतिज्ञा पत्र
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना करण्याची पद्धत
ऑफलाइन
- या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीने आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात त जावे लागेल.
- जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण करण्याचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक ती लागणारे कागदपत्रे सर्व जोडून घ्यायची आहेत.
- त्यानंतर तू अर्ज आपल्याला संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे व त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकाल
ऑनलाइन
- या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर कृषी विभागात कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर Save या बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकाल.
विचारले जाणारे प्रश्न
1. महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाणार आहे?
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 80% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
2. कोण कोणते यंत्र खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे?
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित अवजारे
- मनुष्य चलित यंत्र /अवजारे
- प्रक्रिया संच
- पलोउत्पादक यंत्र/अवजारे
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयं चलित यंत्रे
3. महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ कोणाला दिला जाणार आहे?
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ,अनुसूचित जाती धर्मातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारे शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
4. महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचा फायदा काय आहे?
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेचा फायदा शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे तसेच या योजनेअंतर्गत गरीब व गरजाळू शेतकऱ्यांना शेतातील कामे वेळेवर पूर्ण होऊन लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतीमध्ये यांत्रीकरणाला मोठी गती मिळणार आहे
निष्कर्ष
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण या योजनेबद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जर तुमचे कोणाचे काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि अशाच नवीन योजनेची माहिती घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप जॉईन करा किंवा मराठी माहिती तंत्रज्ञान या संकेतस्थळाला भेट द्या.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.