गट ब अन् गट क राज्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये पदभरतीला सुरुवात होणार आहे. गट ब आणि गट क वर्गातील संवर्गांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वरून पोस्ट करत सांगितले की, शासन सेवेतील ‘गट ब आणि गट क ‘या पदांसाठी जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून ‘गट ब आणि गट क ‘पदांसाठीची जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्यात यावी अशी विनंती केली. त्यांनी पुढच्या आठवड्यात ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या आश्वासनामुळे इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
हे वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाची भरती 14298 जागा.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने राज्यात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. आणि आता पुन्हा राज्य सरकारने गट ब, आणि गट वर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
गट ब अन् गट क जाहिरात पुढील आठवड्यात
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्या दिवशी लागू शकते. यामुळे त्या अगोदरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पद रिक्त आहेत. यासाठी सरकार कोणत्या विभागात आणि किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार, हे पुढच्या आठवड्या मध्ये स्पष्ट होणार आहे.
1 thought on “पुढच्या आठवड्यात गट ब अन् गट क पदांसाठी मोठी भरती; देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती”