Aadhar Card Center : सध्याच्या काळात शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी आधार सेंटर नागरिकांना गाठावं लागते त्यामुळे सध्याच्या काळामध्ये आधार सेंटरला चांगलेच डिमांड असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच अनेक जणांच्या मनामध्ये आधार सेंटर सुरू करण्याचा विचार येत आहे. अशा व्यक्तींसाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

पुणे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू (Aadhar Card Center) करण्यासाठी आवश्यक असलेल्या नवीन आधार किट वितरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संधी विशेषता : अशा व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणार आहे जे नागरिक आपल्या गावात किंवा तालुक्यात आणि शहरात अधिकृत आधार सेवा केंद्र उघडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. या दोन जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा कारण की अर्ज करण्यासाठी कालावधी अत्यंत मर्यादित आहे. असे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.Aadhar Card Center
हे वाचा : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती
पुणे जिल्हा -अर्ज कसा सादर करायचा?
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आधार नोंदणी संच वाटपासाठी 9 मे 2025 पासून सुरू झाले आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 23 मे 2025 आहे .इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने https://pune.gov.in/notice/pune-district-new-aadhar-kit-distribution-sop/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती आणि अर्ज पीडीएफ डाउनलोड करून घ्यावी .
अर्ज पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर तो अर्ज विहित नमुन्यात भरून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रत्यक्षसादर करावा लागणार आहे यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती खाली दिली आहे
अर्ज पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर तो अर्ज विहित नमुन्यात भरून जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रत्यक्षसादर करावा लागणार आहे यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती खाली दिली आहे.
- विहित नमुन्यातील भरलेला अर्ज(पीडीएफ मध्ये दिलेला फॉर्म)
- आधार सुपरवायझर सर्टिफिकेट
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड
- कमीत कमी बारावी उत्तीर्ण शिक्षण पात्रता असणे आवश्यक आह ह
- यानंतर ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद यांच्याकडून मिळालेला ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
- आपले सरकार सेवा केंद्र डॅश बोर्ड स्क्रीन शॉट (म्हणजेच महाऑनलाईन ID आवश्यक).
- पासपोर्ट साईज फोटो.
अर्ज केल्यानंतर अर्ज फक्त रिक्त जागांसाठी स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रिक्त जागांची माहिती घ्यावी. लागणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून अर्ज कार्यालयात जमा करणे खूप महत्त्वाचे आहे याशिवाय पीडीएफ मध्ये नमूद केलेल्या अटी व पात्रता निकष काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. Aadhar Card Center
नागपूर जिल्हा -या जिल्ह्यासाठी फक्त ऑनलाईन अर्ज
नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध आहे या जिल्ह्यातील उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे . नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 9 मे 2025 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे . ‘अर्जदार उमेदवारांनी https://nagpur.gov.in/notice/advertisement-regarding-the-distribution-of-aadhaar-kits/ या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे तुमचा अर्ज सादर करावा .
नागपूर जिल्ह्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोणताही अर्ज प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारला जाणार नाही . इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज फक्त गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच करता येणार आहे .या उमेदवारांना अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे स्कॅन कॉपी अपलोड करणे बंधनकारक आहे .त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करताना सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपातच तयार ठेवणे आवश्यक आहे . Aadhar Card Center
महत्वाची सूचना
पुणे आणि नागपूर जिल्ह्यामधील उमेदवारांना आधार सेवा केंद्र सुरू करण्याची खूप मोठी संधी आहे .त्यामुळे ही संधी मिस न करता याचा पुरेपूर फायदा घ्यावा .इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे .पुण्यात प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याची पद्धत देण्यात आली आहे तर नागपूर मधील उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत लागू करण्यात आली आहे .या दोन्हीही जिल्ह्यासाठी अंतिम मुदत खूप जवळ आली आहे .त्यामुळे चूप असणारे उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावा आणि एक स्थिर उत्पन्नाचे साधन निर्माण करावे .
नागरिकांना यासंबंधीची अधिकृत माहिती,अर्ज नमुना आणि अवश्य कागदपत्राची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.उमेदवारांनी आपला अर्ज करण्या अगोदर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात आणि अधिकृत सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.Aadhar Card Center