ट्रॅक्टर अनुदान योजना – केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जातात यामध्येच शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत व्हावी म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदानित केले जातात हे अनुदान शेतकऱ्यांना किती दिलं जातं. याबाबतची माहिती आज पाहूया.
राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान विकत केला जातो यामध्ये ट्रॅक्टरच्या घटकानुसार अनुदान वितरित केले जातात ट्रॅक्टर चे प्रकार अर्जदाराचा प्रवर्ग यानुसार अनुदानाची मर्यादा कमी जास्त ठेवण्यात आलेले आहे आता आपण कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिलं जातं याबद्दलची माहिती खाली पाहूया.

हे वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे.
ट्रॅक्टर अनुदान योजना प्रकार व प्रवर्ग.
ट्रॅक्टर अनुदान योजना टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर साठी.
- आठ ते वीस एचपी अनुसूचित जाती-जमातीसाठी एक लाख रुपये व सर्वसाधारण घटकासाठी 75 हजार रुपये अनुदान दिले जाते
- वीस पेक्षा जास्त व 40 पेक्षा कमी एचपी साठी अनुसूचित जाती जमातीसाठी एक लाख 25 हजार व सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी एक लाख रुपये अनुदान दिले जाते.
- चाळीस एचपी पेक्षा जास्त आणि 70 hp पेक्षा कमी यामध्ये अनुसूचित जाती जमातीला एक लाख 25 हजार रुपये व सर्वसाधारण घटकाला एक लाख रुपये अनुदान दिले जाते.
4 wd ट्रॅक्टर अनुदान
- आठ ते वीस एचपी अनुसूचित जाती जमातीसाठी एक लाख रुपये व सर्वसाधारण साठी 75 हजार रुपये.
- वीस एचपी पेक्षा जास्त व 40 एचपी पेक्षा कमी अनुसूचित जाती जमातीसाठी एक लाख 25 हजार रुपये व इतर लाभार्थ्यासाठी म्हणजे सर्वसाधारण साठी एक लाख रुपये.
- 40 एचपी पेक्षा जास्त असताना ट्रॅक्टरला अनुसूचित जाती जमातीसाठी एक लाख 25 हजार रुपये व इतर लाभार्थ्यासाठी म्हणजे सर्वसाधारण घटकासाठी एक लाख रुपये अनुदानित केले जाते.
कृषि यांत्रिकीकरण पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.