अहिल्याबाई महिला स्टार्टअप : mahila startup yojana महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवीन योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य आत्ताच दोन महिने अगोदर माझी लाडकी बहीण जोरदार चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने महिलांसाठी अजून एक नवीन योजना सुरू केलेली आहे. ती योजना कोणती, योजनेअंतर्गत कोणाला लाभ दिला जाणार आहे, करण्याची प्रक्रिया, आवश्यक लागणारे कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
अहिल्याबाई महिला स्टार्टअप महिलांसाठी नवीन योजना
महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वर्धा जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई महिला स्टार्टअप या योजनेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप ही योजना महिलांसाठी उद्योजकतेच्या संधी वाढवणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे महत्त्व
अहिल्याबाई महिला स्टार्टअप ही योजना महिलांसाठी सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. महिलांना या मदतीमुळे स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करता येऊ शकेल.या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाणार आहे जेणेकरून महिलांना स्वतःचा नवीन उद्योग सुरू करता येऊ शकेल .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत एकूण तरतुदी पैकी 25 टक्के मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील महिलांना राखीव ठेवण्यात आलेली आहे.
यामुळे राज्यातील प्रत्येक महिलांना या योजनेअंतर्गत सहभाग घेता येईल आणि आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यास मदत देखील होईल.
अहिल्याबाई महिला स्टार्टअप योजना सविस्तर माहिती.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी कोण पात्रता असेल
- स्टार्टअप ला केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापर प्रोत्साहन विभागाची मान्यता आणि स्टार्टअप महाराष्ट्रात नोंदणीकृत असला पाहिजे.
- स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक किंवा सह – संस्थापकाचा कमीत कमी 51% हिस्सा असला पाहिजे.
- महिला स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्य करत असणे गरजेचे आहे.
- महिला स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी पर्यंत असायला पाहिजे.
- महिला स्टार्टअप यांनी या अगोदर राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
महिला स्टार्टअप योजनेचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना अर्ज करण्यासाठी अधीकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर, योग्य पद्धतीने निवड करण्यात येईल आणि निवड झालेल्या महिलांना या योजनेअंतर्गत महिलाला लाभ दिला जाईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवीन योजना अहिल्याबाई महिला स्टार्टअप सुरू, पाहा सविस्तर माहिती.”