पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महाराष्ट्र राज्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात झेप घेण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसाय वाढ करण्यासाठी महिलाना उपयुक्त अशी योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना शासनाने राबवण्यास परवानगी दिली आहे. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महिलांच्या नेतृत्वात  असणाऱ्या नवीन स्टार्टअप ला त्यांच्या अवश्यकता नुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. जेणे करून त्यांच्या व्यवसायात त्यांना वाढ करण्यास सहकार्य लाभेल व अन्य महिलांना देखील रोजगार लाभेल. तसेच स्थानिक कच्चा माल उपलब्धते नुसार नवीन स्टार्टअप सुरू होण्यास प्रोस्थाहण मिळेल. या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढेल व त्यांच्या स्टार्टअप करण्याच्या दृष्टीत विकास होईल. तसेच ग्रामीण व शहरी भागात शेवटच्या थरापर्यंत स्टार्टअप करण्याच्या प्रयत्नात वाढ होईल. 

हाच दृष्टीकोण ठेऊन शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यात आली आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना च्या माध्यमातून व्यवसायात वाढ करण्यास मदत मिळनार आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण या योजनेमद्धे कोण पात्र आहे या साठी कोणते कागदपत्रे अवश्यक आहेत यात अर्ज कसा करावा या बाबत सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना उदिष्ट.

 • महाराष्ट्रातील महिला नेतृत्वातिल  स्टार्टअप ला पाठबळ देणे. 
 • नवीन व्यवसाय करणाऱ्या व नावीन्य पूर्ण संकल्पना असणाऱ्या उद्योगात वाढ करण्यासाठी एक वेळ आर्थिक सहाय्य करणे. 
 • राज्यातील महिला स्टार्टअप ला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे. 
 • देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असणारे राज्य म्हणून ओळख निर्माण करणे. 
 • महिला स्टार्टअप च्या माध्यमातून रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करणे. 
 • राज्यातील महिला स्टार्टअप ला त्यांच्या आर्थिक उलाढाली नुसार 1 लाख ते 25 लाख रुपया पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे. 

योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता

 1. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोस्थाहण विभाग  अंतर्गत मान्यता प्राप्त महाराष्ट्रातील महिला स्टार्टअप. 
 2. स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक / सहसंस्थापक यांचा किमान 51 टक्के वाटा असणे आवश्यक आहे. 
 3. महिला स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे . 
 4. महिला स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही 10 लाख ते 1 कोटी पर्यंत असणे आवश्यक आहे. 
 5. महिला स्टार्टअप यांनी या आधी राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. 

आवश्यक कागदपत्रे

 • कंपनी प्रस्ताव  
 • कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (MCA)
 • DPIIT मान्यता प्रमाणपत्र
 • कंपनी बँक खाते स्टेटमेंट 
 • या आधी शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वायघोषणा प्रमापत्र. 
 • आधार कार्ड 

अर्ज प्रक्रिया

या योजेमद्धे सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या msins.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.  अर्ज करण्यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकरले जाणार नाही अर्ज पूर्णतः निशुक्ल असेल. 

निवड प्रक्रिया

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना मध्ये निवड प्रक्रिया 

 • रोजगार निर्माण करणाऱ्या स्टार्टअप ला प्रथम प्राधान्य. 
 • निवड प्रक्रियेसाठी शासनाकडून विविध समित्या नेमण्यात येतील 
 • या समित्याच्या मध्यमातून बँकिंग तसेच स्टार्टअप क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने निवड प्रक्रिया व निधी वितरण प्रक्रिया राबवण्यात येईल. 

शासनाचा जीआर पाहण्यासाठी 

अधिकृत संकेतस्थळ 

Leave a comment