दूध अनुदानात वाढ : करण्यात आलेली आहे त्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांना आणि दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपये अनुदान (Millk Farmers) देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांना आणि दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
दूध अनुदानात वाढ राज्यामध्ये काही महिन्या अगोदर सर्व खाजगी व सरकारी दूध संघांना तसेच शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. आणि सदर दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते. परंतु आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. राज्य सरकारने, राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांना आणि दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदानावरून आता 2 रुपये वाढ करण्यात आलेले आहे म्हणजेच दूध उत्पादकांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दूध उत्पादकांना दूध संघांनी 3.5 फॅट/8.5 एस एन एफ या प्रति करिता 1 ऑक्टोंबर 2024 पासून 28 रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे.यामुळे राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांना आणि दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना खूप फायदा होणार आहे.
या तारखेला होणार पीएम किसान चा 18 वा हप्ता जमा.
दूध अनुदानात वाढ शासनाचा निर्णय
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांना आणि दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना दूध अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या दूध उत्पादकांना शासनामार्फत प्रतिलिटर 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच या दूध उत्पादकांना अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये भाव इथून पुढे दिला जाणार आहे. ही योजना एक आक्टोंबर 2024 पासून राबविण्यात येईल, पण मात्र या योजनेचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी शासनाकडून 965 कोटी 24 लाख रुपये या योजनेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
दुध काढणी यंत्र. Milking Machine Price
राज्यातील दूध उत्पादकांना शासनामार्फत 7 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर 35 रुपये एवढा भाव इथून पुढे मिळत राहणार आहे. ही योजना 1 ऑक्टोंबर 2024 पासून राबविण्यात येईल , पण मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “दूध अनुदानात वाढ, दूध उत्पादकांना दिलासा पहा सविस्तर माहिती”