anudan second list अपडेट कापूस सोयाबीन अनुदान यादीमध्ये नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. ज्या ई – पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन अनुदान यादी मध्ये नाव नसेल अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
आपण या लेखांमध्ये आज ई- पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु पहिल्या टप्प्यातला यादीमध्ये नावे आली नाही अशा शेतकऱ्यांनी यापुढे काय करावे याबद्दल सविस्तर माहिती पहा.
ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर केली आहे. अश्या शेतकऱ्यांना लाभ देणीसाठी कापूस सोयाबीन आनूदान दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी कशी व कोणामार्फत जाहीर केली जाणार याची माहिती पाहूया.
anudan second list कापूस-सोयाबीन अनुदान
कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन एकरच्या मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच शासनाकडून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4 हजार 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निधी ज्या शेतकऱ्यांची यादी मध्ये नाव आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे . आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु यादीमध्ये नाव नाही. अशा शेतकऱ्यांनी यापुढे काय करावे लागेल याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
कापूस – सोयाबीन अनुदान लाभ घेण्यासाठी प्रोसेस
anudan second list कापूस – सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ई – पीक पाहणी करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण की या कापूस सोयाबीन अनुदानाचा लाभ अशा शेतकऱ्यांना दिला जातो ज्या शेतकऱ्यांनी आपली ई- पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यातल्या यादीमध्ये आलेली आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातल्या यादीमध्ये ई – पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची नावे आता दुसऱ्या टप्प्यात यादीमध्ये देण्यात येणार आहे.
anudan second list मध्ये नाव कसे नोंदवले जाईल
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी करून आपल्या सात बारेवर केली आहे, या शेतकऱ्याची यादी महसूल विभागाकडून कृषि विभागाला वितरित करण्यात येणार आहे. या यादी मध्ये खरीप 2023 मध्ये ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट असेल. कृषि विभाग या यादी मधून कापूस व सोयाबीन नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव शॉर्ट लिस्ट करेल. त्या नंतर पहिल्या यादी मध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव यातून वगळण्यात येईल व उर्वरित शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
हे वाचा : पीएम किसान चा 18 वा हप्ता जमा.
दुसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील प्रक्रिया.
दुसरी यादी कृषि विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येईल. त्या नंतर कृषि विभाग ती यादी गावानुसार वेगळी करून कृषि सहाय्यक यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात प्रसिद्ध करण्यात येईल अर्थात गावात दर्शनी भागात लावली जाईल.
anudan second list प्रसिद्ध केल्यानंतर यादी मध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या कृषि सहाय्यक यांच्याकडे आपले कागदपत्रे म्हणजे आपले आधार सहमति पत्र व आधार कार्ड झेरॉक्स जमा करावे लागणार आहे. कागदपत्रे जमा केल्यानंतर आपली कृषि सहाय्यक यांच्या मध्यमातून kyc पूर्ण केली जाणार आहे. kyc पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान रक्कम वितरित केली जाणार आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.