पिंक ई-रिक्षा योजना: या योजनेसाठी 600 महिलांना मिळणार अर्थसहाय्य .

पिंक ई-रिक्षा योजना : महिला व बालविकास विभागाने महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि प्रवासी महिलांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल.

पिंक ई-रिक्षा योजनेची उद्दिष्टे

पिंक ई-रिक्षा योजनेमागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य, रोजगार आणि इतर सुविधा पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय, महिलांच्या सामाजिक पुनर्वसनाला चालना देऊन स्त्री सशक्तीकरणाचा विस्तार करणे हेसुद्धा या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

हे वाचा : व्यवसायासाठी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा, आत्तापर्यंत 2 लाख तरुणांनी घेतला लाभ.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

पिंक ई-रिक्षा योजना अनुदान आणि कर्ज सुविधा

पिंक ई-रिक्षा योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. योजनेत ई-रिक्षाच्या किमतीमध्ये जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स आदी करांचा समावेश राहणार आहे. तर या मध्ये राज्य शासन २०% आर्थिक भार उचलणार असून रिक्षाच्या किमतीच्या ७०% रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध केली जाईल ज्या मध्ये नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खासगी या बँकांकडून ई- रिक्षा किमतीच्या ७० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महिलांना १०% स्वहिस्सा भरण्याची गरज आहे. ई – पिंक रिक्षा खरेदी करणाऱ्या महिलांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी ५ वर्षांची मुदत देण्यात येणार आहे .

पिंक ई-रिक्षा योजना लाभार्थींसाठी अटी

ई – पिंक रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अर्जदार महिलाचे वय २० ते ४० वर्षांदरम्यान असावे.
  • अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्या साठी वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • विधवा, घटस्फोटित, अनाथ किंवा राज्यगृहातील प्रवेशित महिलांना प्राधान्य दिले जाईल.
  • महिलाना लाभ एकदाच घेता येईल आणि शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

ई-रिक्षा चालवण्यासाठी विशेष सुविधा

महिलांना ई-रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक परवाने, परमिट, बॅच बिल्ला आणि प्रशिक्षण यांसारख्या सुविधा पुरवल्या जातील. यासाठी ई-रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीमार्फत मदत केली जाईल.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

पिंक ई-रिक्षा योजना योजनेचा लाभ एकदाच

दारिद्र रेषेखालील महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महिलांना या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येणार आहे, जर ती महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असेल तर या योजनेचा लाभ त्या महिलेला घेता येणार नाही. तसेच, या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला कर्ज घेण्यासाठी पात्र असावी, त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही त्या महिलेची राहणार आहे .पिंक ई-रिक्षा घेण्यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज  करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार ,महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे आणि जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागाने केले आहे. णि इतर अधिकारीही योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत.

महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा अध्याय

पिंक ई-रिक्षा योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे.पिंक ई-रिक्षा योजना

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Leave a comment