पीएम विश्वकर्मा लाभ योजनेतून सध्या कोण कोणता लाभ मिळतो, जाणून घ्या सविस्तर माहिती

पीएम विश्वकर्मा लाभ सध्या केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ देशातील नागरिक घेत आहेत. या योजनेअंतर्गत 18 पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना लाभ देण्यात येतो. तसेच या योजनेअंतर्गत व्यवसायिकांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत ही देण्यात येते. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आलेली आहे. जेणेकरून या योजनेअंतर्गत छोट्या मोठ्या व्यवसायिकांना व कलाकारांना त्यांच्या व्यवसायात वाढ व्हावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

पीएम विश्वकर्मा लाभ या योजने अंतर्गत व्यवसायिकांना प्रशिक्षण, त्यांना व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी रक्कम दिली जाते आणि त्यांच्या व्यवसायात वाढ करण्यासाठी त्यांना पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये कर्ज दिले जाते या कर्जाचा व्याजदर हा वार्षिक पाच टक्के दराने आहे. तर तर जाणून घेऊया पीएम विश्वकर्मा योजनेत सध्या कोण कोणता लाभ मिळतो. सविस्तर माहिती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : विश्वकर्मा शिलाई मशीन प्रशिक्षण

पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत किती रुपयांचे कर्ज मिळते?

पीएम विश्वकर्मा लाभ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपये इतके देण्यात येते. त्यानंतर २ टप्प्यांमध्ये दोन लाख रुपये एवढे कर्ज दिले जाते. जेणेकरून व्यवसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये या कर्जाअंतर्गत वाढ करू शकतात.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जासोबतच हा पण लाभ दिला जातो

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जो व्यक्ती पात्र आहे त्या व्यक्तीला कर्जासोबतच अजून काही फायदे मिळतात. या योजनेअंतर्गत पहिला फायदा म्हणजे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना काही दिवस व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असणाऱ्या व्यक्तींना जोपर्यंत प्रशिक्षण सुरू आहे तोपर्यंत त्यांना दररोज 500 रुपये स्टायपेंड दिला जातो. याशिवाय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी 1500 हजार रुपये दिले जाते.

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळतो

पीएम विश्वकर्मा लाभ खालील दिलेली व्यक्ती घेऊ शकतात.

  • सुतार
  • सोनार
  • बांधकाम मिस्त्री
  • लोहार
  • बोट बनवणार
  • मूर्तिकार
  • कुंभार
  • चांभार
  • नावी
  • हार बनवणारा
  • धोबी भ
  • मासेमारी जाळे बनवणारा
  • टेलर
  • बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी बनवणारा
  • दगड फोडणारे मजूर
  • शिल्पकार
  • टोपली, चटई, झाडू बनवणारे
  • टाळे बनवणारे कारागीर
    प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गतकर्ज मिळवण्यासाठी या 18 क्षेत्रातील व्यवसायिक पात्र आहेत.

Leave a comment