मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती पहा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधासाठी सोलर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहे . मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न पूर्ण होऊन त्यांच्या शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल . तर आज आपण या लेखांमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रता काय आहे याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहूया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्टे

  • शाश्वत ऊर्जेचा वापर करून सिंचन सुधारणे.
  • विजेवरील अवलंबित्व कमी करणे.
  • शेतकऱ्यांना कमी खर्चात पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे.

हे वाचा : गावरान कोंबडी पालनातू महिन्याला कमवतात दोन लाख रुपये

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत वीज बिलाची समस्या पूर्णतः दूर होणार आहे
  • सौर पंप फक्त 10% खर्चात उपलब्ध.
  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातींसाठी फक्त 5% खर्च.
  • 3 HP ते 7.5 HP क्षमतेचे पंप अर्जासाठी उपलब्ध आहेत
  • 5 वर्षांसाठी पंपाची विमा व दुरुस्तीची हमी.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता

  • आर्जदारकडे पाण्याचा विश्वसनीय स्त्रोत (विहीर, बोअरवेल, नदी किंवा तळे) असावेत .
  • आर्जदारच्या जमीनीच्या आकारावर पंपाची क्षमता निश्चित होते:
    • 3 HP: 2.5 एकरपर्यंत.
    • 5 HP: 2.5 ते 5 एकर.
    • 7.5 HP: 5 एकरांपेक्षा जास्त.
  • मागील सौर पंप योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी अर्ज करू शकतात.
  • विहिरी, बोअरवेल, नद्या किंवा तळ्याजवळील शेतकरी या योजने साठी पात्र आहे .

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. 7/12 उतारा: पाण्याच्या स्रोतासह.
  2. आधार कार्ड: ओळखीचा पुरावा.
  3. बँक पासबुक: बँक खात्याचा तपशील.
  4. जातीचे प्रमाणपत्र: अनुसूचित जाती-जमातींसाठी.
  5. पाण्याचा स्रोत प्रमाणपत्र: भुजल विभागाचा दाखला (डार्क झोनसाठी). 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज प्रक्रिया

  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php अधिकृत पोर्टलवर जा.
  • पोर्टल वर गेल्यानंतर त्यानंतर सुविधा या टॅब वर क्लिक करून अर्ज करा या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला अर्जामध्ये वैयक्तिक आणि जमिनीची माहिती, रहिवासी पत्ता, जलस्रोत/सिंचन माहिती, कृषी तपशील, अगोदर असलेल्या पंपाचा तपशील, लागणाऱ्या पंपाचा तपशील, बँक तपशील, घोषणापत्र आणि कागदपत्रे अपलोड करून घ्यावी लागतील. आणि अर्ज सबमिट करा या पर्यावरण क्लिक करावे लागेल.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळेल याचा वापर करून तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकतात आणि रक्कम भरणा करू शकतात.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे

  • या योजनेअंतर्गत विजेची बचत व वीज बिलमुक्त शेती होणार आहे .
  • कमी खर्चात सिंचनाचे साधन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यासाठी उपलब्ध होणार आहे .
  • शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण.
  • सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणपूरक शेतीस चालना.

संपर्क

  • टोल-फ्री क्रमांक: 1800-233-3435 / 1800-212-3435.
  • महावितरण कार्यालय: तालुकास्तरीय उपविभागीय कार्यालय.

निष्कर्ष

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कमी खर्चात, पर्यावरणपूरक पद्धतीने सिंचन करणे यामुळे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतीतून अधिक उत्पादन व नफा मिळवावा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

Leave a comment