kukkut palan कळस (ता. इंदापूर) या गावातील महावीर गजानन खारतोडे या तरुणाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. या तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करण्याचे ठरवलं. व्यवसाय करण्यासाठी महावीर गजानन खारतोडे यानी गावरान कोंबड्यांना असलेली मागणी विचारात घेऊन , गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.आणि ते आपल्या व्यवसायात यशस्वी झाले.
कळस गावातील महावीर खारतोडे यांनी गावरान कोंबडी पालनातून आपला व्यवसाय उभारून आर्थिक यश मिळवले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या महावीर यांनी गावरान कोंबडींची पिल्ले, अंडी, आणि मांस विक्रीतून दरमहा दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.
हे वाचा: कुकुट पालन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
kukkut palan खास यंत्र आणि सेंद्रिय पालन पद्धती
कोंबडी पालनात पिल्लांचे उत्पादन वाढ वण्यासाठी महावीर यांनी एक विशेष यंत्र विकसित केले, ज्यामुळे एका वेळेस हजार पिल्लांची निर्मिती होऊ शकते. तसेच, त्यांनी एक एकर जागेत तारेचे कुंपण करून कोंबड्यांना मोकळा वावर मिळावा याची सोय केली आहे. त्यांच्या आंबा आणि शेवग्याच्या झाडांच्या सावलीत कोंबड्या निरोगी राहतात, जे अंड्यांच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे ठरते.
शेतीला जोडधंदा
महावीर यांनी कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केला होता, जो आता त्यांच्यासाठी आर्थिक स्थैर्याचे साधन ठरला आहे.
1 thought on “kukkut palan : गावरान कोंबडी पालनातू महिन्याला कमवतात दोन लाख रुपये”