मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम संपूर्ण माहिती
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेसारखीच प्रसिद्ध झालेली एक योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना (मुख्यमंत्री योजनादूत ) ही योजना सध्या महाराष्ट्र मध्ये लाडकी बहिणी या योजनेसारखेच लोकप्रिय होत आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जलकन्यान कक्षा यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.
Table of Contents
Toggleयुवा प्रशिक्षण या योजनेची घोषणा 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा प्रचार, प्रसिद्ध करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50 हजार योजना दूत नेमण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे . तर आज आपण या लेखांमध्ये योजनांसाठी योजना दूत उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तसेच अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती पाहणार आहोत.
मुख्यमंत्री योजनादूत माहिती
या योजनेबाबतचे सर्व जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनाय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जे मानधन दिले जाणार आहे ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमास सुरुवात 2024 25 या आर्थिक वर्षापासून मान्यता देण्यात आलेली आहे. या योजना दुतांच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कारवाई व माहिती जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाची प्रचार, प्रसिद्ध करणे व त्यांच्या जास्तीत जास्त व्यक्तींना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50 हजार योजनादूत निवडण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच मुख्यमंत्री योजनादूत हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योजना दूत हे प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी नेमले जाणार आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक, शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनांदुताची निवड केली जाणार आहे.
मुख्यमंत्री योजनादूत पात्रता आणि निकष
मुख्यमंत्री योजनादूत पात्रता आणि निकष काय आहे ते जाणून घेऊया खालील प्रमाणे
- या योजनेअंतर्गत 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तींचे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
- शिक्षण- कोणतेही शाखेचा किमान पदवीधर
- अर्ज करण्याच्या व्यक्तीकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड, बँक खाते बँक त्याला आधार नंबर लिंक असावे
मुख्यमंत्री योजनादूत आवश्यक लागणारी कागदपत्रे
- मुख्यमंत्री योजना दूत विहित नमुन्यातील केलेला ऑनलाईन अर्ज
- आधार कार्ड
- आदिवासी प्रमाणपत्र
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- हमीपत्र
- 12 वी/पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे/प्रमाणपत्र इत्यादी.
मुख्यमंत्री योजनादूत नेमणूक प्रक्रिया
- या योजनेअंतर्गत उमेदवाराच्या नोंदणीचे व अर्जाची छाननी सर्वप्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालना लय द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे.
- या योजनेची संपूर्ण छाननी अर्जामध्ये नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे.
- या योजनेअंतर्गत ऑनलाइन रित्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
- उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी जिल्हा माहिती अधिकारी सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने , प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करण्यात येईल. (यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा विषयीक मूळ कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत) त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्यांचा करार केला जाईल. या कराराचा कालावधी वाढवला जाणार नाही.
- जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी एक शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवण्यात येईल.
- या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. नेमणुकीच्या आधारे भविष्याचा शासकीय सेवेत नियुक्त ची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र पत्र निवड झाल्यास उमेदवाराकडून घेण्यात येईल.
निवड झालेल्या योजनादुतचे कामे
- या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.
- प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेली काम पाडणे त्यावर बंधनकारक आहे.
- या योजनेअंतर्गत रात्र झालेल्या उमेदवारांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्ध करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय शासनाच्या योजनेची गुरुवर माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील.
- या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांनी रोज दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करावा लागेल.
- या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांनी त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा गैर फायदा घेऊ नये. जर योजना दूत असे करीत असल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
- योजना दूध गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन दिले जाणार नाही.
- उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे
- उमेदवाराच्या प्राप्त अर्जाची तसेच, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची छाननी करणे व पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जिल्हा माहिती अधिकारी यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणे.
- निवडण्यात आलेल्या योजना दूत यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने समुपदेशन व निर्देशन कामकाजाचे वाटप करणे.
- योजना दुताना कामाचे वाटप झाल्यानंतर रोजच्या उपस्थितीची हजेरी ऑनलाइन पद्धतीने अहवाल घेणे. मुख्यालय स्तरावरील उपसंचालक (वृत्त )(नोडल ऑफिसर) याबाबत आवश्यक असेल तेव्हा माहिती देणे.
- योजनादुतांनी प्रत्येक दिवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल घेणे. त्यानंतर हा अहवाल जिल्हा माहिती अधिकारी व नोडल ऑफिसर, माहिती जनसंपर्क महासंचालनाय यांना पाठविणे
- योजना धुतांच्या मानधनाची देयके तयार करून जिल्हा माहिती अधिकारी यांना सादर करणे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.