Passport application पासपोर्ट काढणे झाले अगदी सोपे असा करा अर्ज.

Passport application : पासपोर्ट काढणे झाले अगदी सोपे असा करा अर्ज.

Passport application in marathi – बाहेर देशात प्रवास करायचा म्हटलं की पासपोर्ट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी पासपोर्टचा वापर हा व्यक्तीच्या ओळखपत्रासाठी सुद्धा केला जातो. passport seva  पासपोर्ट शिवाय आपल्याला दुसऱ्या देशात जाता येत नाही मात्र पासपोर्ट काढायचा कसा किंवा याची प्रक्रिया काय अप्लाय कसा करायचा कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागतात ह्या गोष्टी बऱ्याच जणांना अडचणी निर्माण करतात.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Passport application in marathi यामध्ये ऑनलाईन अर्ज करायचा की ऑफलाईन अर्ज करायचा याही शंका बऱ्याच जणांच्या मनात आहे म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण पासपोर्ट काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात व अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत.

Passport application पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

जन्म पुराव्यासाठी– दहावीची गुणपत्रिका/ जन्म प्रमाणपत्र/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक

रहिवाशी पुराव्यासाठी – आधार कार्ड / रेशन कार्ड / लाईट बिल / भाडे करारपत्र /बँक पासबुक / पाणीपट्टी बिल / पोस्ट पेड मोबाईल किंवा लँडलाईन बिल यापैकी एक.

फोटो आयडी पुरावा– आधार कार्ड /पॅन कार्ड /ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड यापैकी एक

पासपोर्ट फोटो – पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

Passport application

पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज कसाकरावा

  • सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्टचे अधिकृत संकेतस्थळ https://www.passportindia.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल
  • तुम्हाला पासपोर्ट सेवा पोर्टलवर लॉगिन करावे लागेल (जर आपली नोंदणी आधी झालेली नसेल तर आधी नोंदणी करणे आवश्यक आहे)
  • नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर अर्जाचा प्रकार दिसेल ज्यामध्ये नवीन पासपोर्ट, नूतनीकरण अर्ज आणि अल्पवयीन हे पर्याय दिसतील.
  • यापैकी आपल्याला नवीन पासपोर्ट काढायचा असल्यास न्यू पासपोर्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • आवश्यक असणारी कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड बँक, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो असे डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करा.
  • सबमिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर पेमेंट करा पर्यावरण क्लिक करा आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोत(उदा- डेबिट कार्ड/क्रे डिट कार्ड /यू पीआय /नेटबँकिंग) निवडून पेमेंट करा.
  • तुमच्या जवळच्या अधिकृत सेंटरला तपासणीसाठी तारीख आणि वेळ बुक करा.
  • अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्या.
  • या पद्धतीने आपला अर्ज यशस्वी रित्या सबमीत झाला आहे.

अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय

आपण ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आपण निवडलेले तपासणी सेंटर व आपल्याला मिळालेली तारीख आणि वेळ या नुसार आपण त्या तपासणी सेंटर वर हजार राहणे अवश्यक आहे. आपल्या कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर आपल्याला  आपल्याला पुढील कामकाजच्या 3 ते 5 दिवसात पासपोर्ट निर्गमित करण्यात येईल.

 

Leave a comment

Close Visit Batmya360