लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर लाभ घेण्यासाठी पहा सविस्तर माहिती

लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर

   या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. या घोषणेमध्ये त्यांनी असे सांगितले की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे.  यासाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या कुटुंबांना गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मोफत गॅस सिलिंडर लाभ घेण्यासाठी ई - केवायसी करणे आवश्यक आहे

   राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थी कुटुंबांना दरवर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी  हे कुटुंब पात्र ठरवण्यात आलेले आहेत. पात्र असणाऱ्या कुटुंबातील लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ई – केवायसी करून घ्यावी अशी घोषणा करण्यात आलेली आहे.

मोफत गॅस सिलेंडर

   तसेच माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबासोबतच केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींसाठी देखील मोफत मोफत रेशनच्या सुविधाचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ई – केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.

मोफत गॅस सिलेंडर सरकारने ई - केवायसी करण्यासाठी दिलेली मुदतवाढ

    तुम्ही, 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुमचे रेशन कार्ड ई – केवायसी केले नाहीतर लक्षात असू द्या तुम्हाला मोफत रेशन सुविधाचा लाभ दिला जाणार नाही,तसेच माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असून पण तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाणार नाही. म्हणून तुम्ही तुमची 30 सप्टेंबर 2024 पर्यंत जितक्या लवकरात लवकर होईल तितकी लवकर ई – केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

मोफत गॅस सिलेंडर ई - केवायसी कशी करावी

   जर तुम्हाला रेशन कार्ड ई – केवायसी करायची असेल तर त्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.  यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा अडचणीचा सामना करावा लागणार नाही ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. रेशन कार्ड ई – केवायसी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसह तुमच्याजवळ असलेल्या रेशन कार्ड दुकानात जावे लागेल.

मोफत गॅस सिलेंडर ई - केवायसी करण्याची प्रक्रिया

  • ई – केवायसी करण्यासाठी तुम्हाला  रेशन  दुकानात जावे लागेल .
  • रेशन दुकानात जाताना रेशन कार्ड ची एक झेरॉक्स आणि आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागले.
  • रेशन दुकानात गेल्यानंतर, तुम्हाला सांगावे लागेल की, तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ई – केवायसी करायची आहे.
  • त्यानंतर रेशन डीलर पी ओ एस मशीनद्वारे कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या बोटांचे ठसे घेऊन ई – केवायसी करेल.

अशा पद्धतीने मोफत गॅस सिलेंडर  ई – केवायसी केली जाते.

Leave a comment