मोफत पिठाची गिरणी योजना राज्य सरकार व केंद्र सरकार राज्यातील महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना अमलात आणत असतात जेणेकरून या योजनेच्या आधारे महिलांना छोटासा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. आणि छोटासा व्यवसाय सुरू करून त्या घरांमध्ये हातभार लावण्यास मदत होते यामुळे राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र राज्यात राबवत असते.पण ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात येणार आहे.
तसेच आपण आज या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ ग्रामीण असो किंवा शहरी असो या दोन्ही भागातील महिलांना दिला जाणार आहे. तसेच ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबविण्यात येत आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना माहिती
जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना ज्या जिल्हात सुरू आहे त्या जिल्ह्याती महिलांसाठीच मोफत पिठाची गिरणी ही योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जिल्हा परिषद अंतर्गत मोफत पिठाची गिरणी साठी 10,000 रुपये रुपयांची आर्थिक मदत देत आहे. जेणेकरून राज्यातील महिला पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा छोटासा उद्योग सुरू करू शकतील. असा या योजनेचा हेतू आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना फक्त महिलांसाठीच आहे याजिल्हा परिषद योजनेअंतर्गत महिलाच लाभ घेऊ शकतात, तर आज आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत की आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणती, पात्रता आणि निकष काय आहेत, अटी व नियम, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती या लेखामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची सूचना
मोफत पिठाची गिरणी योजना ही योजना केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कडून राबवली जात नाही. ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबवली जात आहे. ज्या जिल्हा परिषद ने मोफत पिठाची गिरणी वाटप बाबत योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच जिल्हा परिषद हद्दीतील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल व याच जिल्ह्यात अर्ज मागवले जातील. त्या मुळे आपल्या जिल्ह्यात मोफत पिठाची गिरणी योजना सुरू आहे का याची खात्री करूनच मग अर्ज करण्याचा विचार करा.
मोफत पिठाची गिरणी योजना उद्देश काय आहे?
मोफत पिठाची गिरणी योजना जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना ज्या जिल्हात सुरू आहे त्या जिल्ह्याती . या योजनेचा लाभ हा गरीब कुटुंबातील महिला ज्यांची परिस्थिती खूप बिकट आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जेणेकरून अशा महिला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून रोजच्या जीवनात लागणारा दैनंदिन खर्च भागवू शकतील. असा या योजनेमागचा उद्देश आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना वैशिष्ट्ये
मोफत पिठाची गिरणी ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील महिलांना लाभ दिला जाणार आहे. जेणेकरून महिला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून घरातील छोटा मोठा खर्च भागू शकेल. मोफत पिठाची गिरणी ही योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणार असून, या योजनेचे अर्ज करण्याची पद्धत ही अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत पात्रता आणि निकष
महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत मोफत पिठाची गिरणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत काही पात्रता आणि निकष खालील प्रमाणे दिलेले आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना ज्या जिल्हात सुरू आहे त्या जिल्ह्याती महिला असणे आवश्यक आहे
- ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्या महिलांचे वय 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे.
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे अवश्य आहेत.
मोफत पिठाची गिरणी योजना फायदे
- जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना ज्या जिल्हात सुरू आहे त्या जिल्ह्याती पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत महिलांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचे माध्यमातून महिला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतील.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी निर्माण होईल.
- या योजनेअंतर्गत महिलांना घरगुती व्यवसाय सुरू झाल्यामुळे काम करण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही
- आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत आपल्या जीवनातील दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे.
योजनेची अटी व नियम काय
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील महिलांना दिला जाणार नाही.
- लाभ घेणाऱ्या महिलांचे वय 18 ते 60 दरम्यान असावे जर 18 पेक्षा कमी आणि 60 पेक्षा जास्त असल्यास ती महिला या योजनेसाठी पात्रता ठरणार नाही.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा जास्त नसावी जर त्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेत लाभ घेण्यासाठी महिला ही गरीब कुटुंबातील असली पाहिजे.
- या योजनेचा अर्ज करणाऱ्या महिला कडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आणि त्या महिलांनी सर्व अटी व नियम चे पालन करणे गरजेचे आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे
ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबवली जात आहे. ज्या जिल्हा परिषद ने मोफत पिठाची गिरणी वाटप बाबत योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच जिल्हा परिषद हद्दीतील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल व याच जिल्ह्यात अर्ज मागवले जातील. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिलेले आहे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक पासबुक
- इत्यादी
अर्ज करण्याची पद्धत
मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणतेही पोर्टल उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्या महिला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात . ज्यावेळेस या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल.
लक्षात असू द्या. ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबवली जात आहे. ज्या जिल्हा परिषद ने मोफत पिठाची गिरणी वाटप बाबत योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच जिल्हा परिषद हद्दीतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत
- ज्या महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांनी आपल्या क्षेत्रातील जिल्हा परिषद किंवा महिला बालविकास कार्यालयामध्ये जाऊन मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज घेतल्यानंतर त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
- दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडून घ्यावी लागेल.
- त्यानंतर तो अर्ज जिल्हा परिषद किंवा महिला व बालविकास विभागात जाऊन जमा करावा लागेल.
- अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याकडून त्या अर्जाची पोहोच पावती घ्यावी लागेल जेणेकरून भविष्यामध्ये उपयोगी ठरेल.
- अशा पद्धतीने तुम्ही मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करू शकाल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.