योजनादूत पद भरती सुरू
योजनादूत पद हे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शसकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व योजनांचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी सरकार कडून योजनादूत हे पद निर्गमित केले जाणार आहे.
Table of Contents
Toggleराज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक पद अशा प्रमाणात एकूण 50 हजार योजना दूत राज्यात नेमले जाणार आहेत याची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पात्रता अटी व नियम तसेच मानधन याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये आपण घेणार आहोत
योजनादूत पद भरती पात्रता
- योजना दूत पदासाठी अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 35 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
पात्रता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
योजनादूत मानधन किती दिले जाणार
योजनादूत पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दहा हजार रुपये प्रति महिना या प्रमाणात मानधन वितरित केले जाणार आहे. याशिवाय यामध्ये कसल्याही प्रकारचा भत्ता किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही. हे मानधन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मार्फत लाभार्थी यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. मानधन हे आधार लिंक बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. त्या मुळे अर्जदाराने व निवड झालेल्या उमेदवाराने आपले खाते आधार लिंक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
पदासाठी नोंदणी कोठे करावी
या पदासाठी नोंदणी करण्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत शासनाचे अधिकृत पोर्टल म्हणजे https://rojgar.mahaswayam.gov.in/ या पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी केल्यानंतर आपल्याला मिळणारी प्रत आपणास आपल्या अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
कागदपत्रे व अर्ज कोठे सादर करा
योजनादूत पद भरती या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फक्त नोंद करायची आहे परंतु आपली निवड प्रक्रिया आणि कागदपत्रे तपासणी हे आपल्या भागातील पंचायत समिती मध्ये केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज जमा करण्यासाठी आपण आपल्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनादूत भरती कालावधी
मुख्यमंत्री योजना दूत हे पद मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना याच्या अंतर्गत नेमले जाणार आहे. त्यामुळे या पदाचा कालावधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो कालावधी ठरविण्यात आला आहे तोच कालावधी या पदासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. मुख्यमंत्री योजना दूत पदासाठी जास्तीत जास्त सहा महिने हा कालावधी असणार आहे त्यानंतर यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कालावधी वाढ केला जाणार नाही.
योजनादूत पद भरती अर्ज
योजनादूत अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनादूत जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
Nice