रब्बी बियाणे अनुदान : 2024 रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकारकडून बियाणे अनुदान योजना राबविण्यात येत आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात जाणाऱ्या रब्बी हंगामातील बियाणे अनुदान योजना अंतर्गत 50% आणि 100%अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पीक व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळितधान्य पीक योजनेअंतर्गत प्रात्यक्षिके, तसेच प्रमाणित बियाण्याचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात येणार आहेत.
रब्बी बियाणे अनुदान अर्ज करण्याची अंतिम तारीख
ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की, रब्बी हंगामातील बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी अंतिम तारीख 6 ऑक्टोंबर 2024 ठरवण्यात आलेली आहे. कृषी विभागाकडून असे आवाहन करण्यात आलेले आहेत की, ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे अनुदानासाठी अर्ज करायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी बियाणे अनुदानासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज लवकरात लवकर करून घ्यावा.
केंद्र सरकारकडून नैसर्गिक आपत्ति ग्रस्त राज्याला निधी मंजूर
कोणत्या पिकाच्या बियाणासाठी मिळणारा अनुदान?
यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी ज्या पिकांची पेरणी केली जाते ते पिके या रब्बी बियाणे अनुदान योजने अंतर्गत समाविष्ट आहेत. त्या पिकांच्या बियाण्याची नावे
- हरभरा
- गहू
- जवस
- करडई
- भुईमूग
- मोहरी
- राजगिरा
- सूर्यफूल.
वरील दिलेल्या या पिकाच्या बियाण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान राज्य सरकारच्या अधिकृत महाडीबीटी या पोर्टलवर या पिकांचे बियाणे अनुदान अर्ज स्वीकारण्यात येत आहेत
रब्बी बियाणे अनुदान 100 टक्के अनुदान
शेतकऱ्यांना पिकाच्या बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला दोन पर्याय मिळतील त्या दोन पर्यायांपैकी पीक प्रात्यक्षिके हा पर्याय तुम्ही निवडला तर तुम्हाला बियाण्यावर 100 टक्के अनुदान मिळणार आहे. पिक प्रात्यक्षिक घटक अंतर्गत एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ट स्वरूपात 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. पण मात्र , तुम्हाला यामध्ये जुने बियाणे मिळणार नाही. फक्त नवीन बियाणे हेच ऑप्शन आहे.
50 टक्के अनुदान
शेतकऱ्यांना पिकाच्या बियाणासाठी ऑनलाईन अर्ज करताना दोन पर्याय दिलेले असतील त्यापैकी हा दुसरा पर्याय आहे. तो म्हणजे प्रमाणित बियाणे. जर तुम्ही या पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करीत असाल तर तुम्हाला प्रमाणित बियाणे या घटकांसाठी 49 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी एका शेतकऱ्याला मर्यादा दोन हेक्टर ठेवण्यात आलेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला नवीन आणि जुने बियाणे अशा दोन्ही प्रकारचे बियाण उपलब्ध करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना निवड केली जाईल त्याच बियाण्याचा तुम्हाला लाभ दिला जाणार आहे.
रब्बी हंगामातील बियाणे अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे
- सातबारा
- 8 अ
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
रब्बी बियाणे अनुदान ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- रब्बी हंगामातून बियाणे अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टलवर जावे लागेल.
- महाडीबीटी पोर्टल लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर दोन लॉगिन करायचे पर्याय दिसतील. आधार क्रमांक टाकून आपण ओटीपी द्वारे लॉगिन करू शकतात.
- लॉगिन केल्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडायचा आहे.
- अर्ज करा हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला बियाणे औषध व कधीही बाब निवडायची आहे.
- आता तुमच्या समोर नवीन फेसबुक ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका, गाव, गट क्रमांक इत्यादी पर्याय निवडायचे आहेत.
- अनुदान हवे असलेली ही बाब निवडायचे.
- त्यानंतर तुम्हाला कोणत्या पिकाच्या बियाण्याचे अनुदान घ्यायचे आहे ते निवडायचे.
- पिकाचे वाण निवडावे
- लाभ घ्यायचा असेल तर क्षेत्र निवडायचे.
- त्यानंतर ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर मुख्य पृष्ठ वरती यावे आणि अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा त्यानंतर प्राधान्यक्रम जीवन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा आहे.
- अशाप्रकारे तुम्ही रब्बी हंगामातील बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्जासाठी शुल्क किती भरावा लागेल?
रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज भरला असेल तर, अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाचा ऑनलाइन शुल्क 26.60 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत.
अर्ज मंजूर होण्याची प्रोसेस
रब्बी बियाणे अनुदान तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेला तो अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडून त्या अर्जाची शहानिशा करून त्यानुसार तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल. अनुदान जेवढे शेतकऱ्यांना द्यायचे आहे त्याच प्रमाणात जर जास्तीत जास्त अर्ज प्राप्त झाले असती तर, तुमची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते . आणि एकदा तुमचा अर्ज मंजूर झाला की काही दिवसातच कृषी विभागातील कृषी सहाय्यक अधिकारी तुम्हाला कॉल करून लाभ घेण्याची माहिती देतात. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या शासकीय कृषी कार्यालयात तुम्हाला रब्बी बियाणे अनुदान योजने अंतर्गत बियाण्याचे वाटप करण्यात येईल.