मुख्यमंत्री वयोश्री योजना वृद्धांसाठी खुशखबर 3000 रुपये आर्थिक मदत

मुख्यमंत्री वयोश्री योजना वृद्धांसाठी खुशखबर 3000 रुपये आर्थिक मदत

 महाराष्ट्र राज्यातील वृद्धांसाठी खुशखबर. राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना उतरत्या वयातील वृद्धांसाठी राबविण्यात आलेली आहे. ही एक वृद्धांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेमध्ये 65 वर्षावरील सर्व पात्र नागरिक असतील. जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 हजार रुपये आर्थिक मदत मिळेल, तसेच त्यांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे देण्यात येणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना वैशिष्ट्ये

  •  या योजनेअंतर्गत वृद्धांना तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
  •  तसेच या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपकरणे म्हणजेच चष्मा, श्रवण यंत्र, वॉकर इत्यादी उपकरणे देण्यात येणार आहेत.
  •  या योजनेअंतर्गत  65 वर्षांवरील वृद्धांना पात्र असतील.
  •  या योजनेमध्ये पात्रता महाराष्ट्र राज्यातील वृद्ध आणि दोन लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेले वयोवृद्ध व्यक्ती योजनेसाठी पात्र असतील.
  •  या योजनेसाठी अर्ज स्थानिक समाज कल्याण विभागात करावा लागेल.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी प्रोसेस

महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील वृद्धांना या योजनेअंतर्गत लाभा घेण्यासाठी स्थानिक समाज कल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा लागेल.

 सविस्तर माहिती पाहण्यासाठी  खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

मुख्यमंत्री वयोश्री  योजना

वयोश्री योजना अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा – वयोश्री योजना अर्ज पीडीएफ

वृद्धांना अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • ओळखपत्र
  •  आय प्रमाणपत्र
  •  जातीचे प्रमाणपत्र

इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

मुख्यमंत्री यांनी दिलेली घोषणा

या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली की, राज्य सरकार वृद्ध नागरिकांच्या कल्याणाकडे गंभीर्याने पहते. ही योजना वृद्धांसाठी आहे, वृद्धांच्या जीवनात  उतरत्या वयात सुख-समृद्धी आणण्यासाठी एक पाऊल आहे.

वयोश्री योजनेचा फायदा

  •  वृद्धांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
  •  वृद्धांचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल.
  •  वैद्यकीय उपकरणामुळे त्यांचे जीवन सुखदायक होईल.
  •  वृद्धांची प्रतिष्ठा समाजात वाढेल.

Leave a comment

Close Visit Batmya360