कडबा कुट्टी मशीन अर्ज करण्यास सुरुवात असा करा ऑनलाइन अर्ज

कडबा कुट्टी मशीन : ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये चालणारा व्यवसाय म्हणजे पशुपालन व्यवसाय ज्यामध्ये दूध व्यवसाय असेल शेळी पालन ,मेंढी पालन, गाय किंवा म्हशी अशा अनेक जनावरांचा व्यवसाय ग्रामीण भागात जास्त चालते . मग अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कडबा कुट्टी मशीन योजना अमलात आणली जेणेकरून या शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या खाद्यासाठी जो चारा वापरला जातो त्या चाऱ्याचे तुकडे करण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी या कडबा कुट्टी मशीनचा वापर केला जातो.

हे वाचा : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 5 वा हप्ता लवकरच होणार जमा.

प्रत्येक शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र घेणे शक्य होत नाही. म्हणून केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी 50 ते 75 टक्के अनुदान कडबा कुट्टी यंत्र घेण्यासाठी सरकार देत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या खाद्यासाठी ज्या चाऱ्याचा वापर करायचे त्या चाऱ्याचे तुकडे करण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी शेतकऱ्यांचा खूप वेळ जातो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मध्ये कडबा कुट्टी यंत्र अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तर आपण आज कडबा कुट्टी यंत्र साठी कोण पात्रता आहे, लागणारी कागदपत्रे, किती अनुदान दिले जाते, अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

50 % अनुदान कडबा कुट्टी मशीन योजना

कडबा कुट्टी यंत्र योजनेचा लाभ कोणाला घेता येईल

कडबा कुट्टी यंत्र 2024 साठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्र दिले जातील. लाभ घेण्यासाठी खालील दिलेले पात्रता असणे आवश्यक आहे.

  • या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनाच घेता येईल.
  • कडबा कुट्टी यंत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांचे क्षेत्र 10 एकर पेक्षा कमी असायला पाहिजे.
  • त्यानंतर शेतकऱ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर लिंक असणे आवश्यक आहे.
  • कुट्टी मशीन यंत्र योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • कडबा कुट्टी यंत्र योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचा व्यवसाय हा शेती असला पाहिजे.
  • या योजनेचा अर्ज करताना अर्जदार व्यक्तीकडे लाईट बिल असले पाहिजे. ज्यामुळे अर्जदार व्यक्तीकडे सिंगल फेज घरगुती वीज बिल कनेक्शन असायला हवे.

कडबा कुट्टी यंत्र योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • जमिनीचा 7/12 व 8 अ.
  • आधार कार्ड
  • विज बिल
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • ई-मेल आयडी
    वरील दिलेले हे सर्व कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी यंत्रासाठी अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे.

कडबा कुट्टी योजनेसाठी सरकार किती देत आहे अनुदान

कडबा कुट्टी योजनेसाठी शेतकऱ्यांना सरकार 50 ते 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही कडबा कुट्टी मशीन 20 हजार रुपयांमध्ये विकत घेतले तर शासनाकडून तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त 10 हजार इतकी रक्कम या योजनेअंतर्गत दिली जाईल.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

कडबा कुट्टी मशीन ची किंमत किती आहे

कडबा कुट्टी मशीन ची किंमत 15 हजार रुपया पासून ते कमीत कमी 20 हजार रुपये पर्यंत चांगली मिशन मिळू शकते. ज्यामुळे शेळीपालन, मेंढी पालन, गाय किंवा म्हशी अशा जनावरांचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना या कडबा कुट्टी यंत्राचा फायदा होईल.

कडबा कुट्टी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील .

कडबा कुट्टी मशीन
  • कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Mahadbt Farmer या वेबसाईट वरती जावे लागेल.
  • Mahadbt Farmer या वेबसाईट वरती गेल्यानंतर गुगल क्रोम वरती जाऊन या (Mahadbt) संकेतस्थळावर जाते ते गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन साठी फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्जदार व्यक्तीचे नाव आणि नंबर व पासवर्ड टाकून तेथे सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर होम पेज वरती जायचे आहे. होम पेजवर गेल्यानंतर आयडिया वर क्लिक करायचे आहे. आयडी वर क्लिक केल्यानंतर युजर नेम, खालील दिलेल्या पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि लॉगिन या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र पुढील बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर पुढे एक अर्ज उघडे त्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्या हा पर्याय निवडून घ्यायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर परत नंतर तुम्हाला मनुष्य चलित अवजारे हा पर्याय निवडून घ्यायचा आहे.
  • हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या यंत्राची निवड करायची आहे. यंत्राची निवड केल्यानंतर तुम्हाला मशीनचे प्रकार दिले जातील. त्यामध्ये तुम्हाला किती एचपीची कडबा कुट्टी मशीन पाहिजे तसा पर्याय निवडून घ्यायचा आहे.
  • पर्याय निवडून घेतल्यानंतर जतन करा या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • हे सर्व केल्यानंतर तुम्हाला पुन्हा होम पेज वरती जायचे आहे. होम पेजवर गेल्यानंतर अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करताना ज्या बाबी निवडल्या होत्या त्या बाबी सर्व होम पेज वरती दिसतील. तेथे तुम्हाला प्रधान्य क्रमांक द्यायचा आहे. आणि प्रधान्य क्रमांक दिल्यानंतर जतन करा या पर्यावरण क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुमचा कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करू शकतात.
  • कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर काही दिवसात या योजनेची लॉटरी लागेल आणि या लॉटरीमध्ये तुमचे नाव आले असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
    अशा पद्धतीने तुमचा कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करू शकतात.
    *

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Leave a comment