जुने फेरफार कसे पहावे : तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट अगदी एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींसाठी देखील तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आपणास हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपण आता एका क्लिक मध्ये उपलब्ध करू शकता.
यातच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे कागदपत्रे देखील एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. याआधी आपण सातबारा आठ अ याबाबत संपूर्ण माहिती पाहिलेलीच आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा फेरफार उतारा कसा डाऊनलोड करायचा किंवा कसा पाहता येतो याची अद्याप पर्यंत कल्पना नाही. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जुने फेरफार नोंदवही मध्ये असणारे ऑनलाईन पद्धतीने कसे पाहता येतील याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फेरफार उतारा म्हणजे काय ?
फेरफार काढणे याआधी आपण फेरफार उतारा म्हणजे नेमकं काय ? याबद्दल माहिती घेण्यास प्रयत्न करू. शेतीची मालकी दर्शवणारे कागदपत्रे यामध्ये सातबारा आणि आठ अ हे प्रामुख्याने आपणास माहितच आहेत. परंतु या सातबारावर कशा पद्धतीने नाव आले किंवा या सातबारावर नाव येण्यामागील काही पुरावा आहे का? तर हा पुरावा म्हणजेच फेरफार उतारा असतो.

जुने फेरफार कसे बघायचे (june ferfar) फेरफार उताऱ्याच्या माध्यमातून आपण खरेदी केलेली जमीन असेल किंवा आपल्याला पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली जमीन असेल, त्यासोबतच आपल्याला बक्षीस स्वरूपात मिळाले जमीन असेल किंवा इतर कोणत्याही पद्धतीने जमीन आपल्या मालकीची झाली आहे हे दर्शवणारे कागदपत्रे म्हणजे फेरफार असतो.
जुने फेरफार कसे पहावे या फेरफार च्या माध्यमातून जमीन आपल्या नावावर कशा पद्धतीने वर्ग करण्यात आली किंवा आपल्याला त्या जमिनीची मालकी कशी मिळाली कोणाकडून मिळाली याची सविस्तर माहिती या फेरफार उतारा मध्ये दर्शवलेली असते.
जुने फेरफार कसे पहावे ? जुने फेरफार कसे काढावे
बऱ्याच वेळा आपणास आपले नवीन फेरफार तात्काळ मिळतात. परंतु काही वेळा इतर अडचणीमुळे किंवा कायद्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या समस्येमुळे आपल्याला आपले जुने फेरफार पाहणे किंवा आपल्या सोबत ठेवणे आवश्यक असते. आता हे जुने फेरफार आपल्याला कसे मिळतील याची माहिती खालील प्रमाणे घेऊ. जून फेरफार कसे पहावे हे समजून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यन्त वाचा.
सरकारी दप्तरांमध्ये 1880 पासून ची जुने फेरफार, सातबारा आणि आठ अ उपलब्ध आहेत. या जुन्या स्वरूपातील कागदपत्रांना ऑनलाइन पद्धतीने मिळवण्यासाठी व जुने रेकॉर्ड ऑनलाइन करण्यासाठी शासनाने एक मोहीम हाती घेतली. ई-अभिलेख या मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील जुने फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेच्या माध्यमातून शासनाने शासकीय पोर्टलवर हे सर्व जुने फेरफार जुन्या सातबारा आणि जुने आठ अ उपलब्ध करून दिलेले आहेत. जून रेकॉर्ड आपण कसे पाहू शकता याची प्रक्रिया खाली दिलेली आहे. जुने फेरफार काढणे
जुने फेरफार कसे पहावे/ जुना फेरफार काढणे (june ferfar online)
- जुने फेरफार पाहण्यासाठी सर्व प्रथम आपणास https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या संकेतस्थळावर जावे लागेल.
- या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास लॉगिन आयडी आणि पासवर्ड मागितला जाईल.
- या ठिकाणी आपणास आपला यूजर नेम आणि पासवर्ड भरावा लागेल. आपल्याकडे यूजर नेम आणि पासवर्ड उपलब्ध नसेल तर आपण नवीन यूजर नोंदणी हा पर्याय वापरुन आपली नोंदणी करू शकता. (नवीन नोंदणी करण्याची प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.)

june ferfar maharashtra जुने फेरफार उतारे आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून समोर दिसणारा कॅप्चर कोड भरून लॉगिन या पर्यायावर क्लिक करा. जुने फेरफार कसे पहावे

- लॉगिन केल्यानंतर आपल्या समोर वरील प्रमाणे पर्याय दिसतील. या मध्ये आपले कार्यालय निवडा ज्या मध्ये आपल्याला सिटी सर्व्हे ऑफिस/तहसील ऑफिस असे पर्याय दिसतील जर त्यातील आपणास तहसील ऑफिस हा पर्याय निवडावा लागेल.
- आपला जिल्हा निवडा. (आत्ता पर्यन्त फक्त 19 जिल्ह्याचे काम पूर्ण झाले असून त्याच जिल्ह्यातील जुने फेरफार पाहता येतील.)
- आपला तालुका निवडा.
- गावाचे नाव निवडा.
- दस्तऐवज प्रकार मध्ये old mutation हा पर्याय निवडावा लागेल.
हे वाचा: शेतात जायला रस्ता नाही, कायदेशीर पद्धतीने रस्ता कसा मिळवायचा?

आपल्या गावातील उपलब्ध असणारे फेरफार याची माहिती आपल्या समोर दिसेल.
(आपला फार फार या दिसणाऱ्या नंबर च्या पुढील असेल तर आपणास https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr/ या संकेतस्थळावर जाऊन आपला फेरफार डाउनलोड करावा लागेल.)
- OK या पर्यायावर क्लिक करा.
- त्या नंतर आपला फेरफार क्रमांक भरा.
- फेरफार क्रमांक भरल्यानंतर शोधा या पर्यायावार क्लिक करा.

अपल्या समोर आपला फेर फार उपलब्ध होईल. फेरफार डाउनलोड करण्यासाठी view या पर्यायावर क्लिक करा. आपला फेरफार अपल्या समोर ओपेन होईल.
फेरफार पाहण्यासाठी नवीन युजर नोंदणी
जुने फेरफार कसे पहावे जुने फेरफार पाहण्यासाठी आपल्याकडे युजर नेम आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. हा युजर नेम पासवर्ड तयार करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा.

नवीन युजर नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. जुने फेरफार कसे पहावे

आपल्या समोर या पद्धतीचा फॉर्म ओपेन होईल. या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरून घ्या. पहिले नाव, मधले नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयता, मोबाइल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्म तारीख. ही सर्व माहिती भरा.

खाली आपला पत्ता भरा. पत्ता भरल्यानंतर आपला युजर नेम तयार करा. युजर नेम चेक उपलब्ध आहे का या वरती चेक करा. त्या नंतर आपला पासवर्ड तयार करा. पासवर्ड तयार केल्या नंतर नोंदणी पूर्ण करा या पर्यायांवर क्लिक करा. आपली नोंदणी पूर्ण झाली असा मेसेज आपल्या समोर येईल.
आपली नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करून आपणास हवा असणारा फेरफार आपण मिळवू शकता. जुने फेरफार कसे पहावे