पीएम किसान निधी योजनेचा एकाच शेतकऱ्याला 2 वेळा हप्ता, राज्यातील 4168 शेतकऱ्यांवर केली जाणार कारवाई.

पीएम किसान निधी : पीएम किसान निधी योजनेत गैरप्रकार झाला असल्याचे समोर आली आहे. पीएम किसान या योजनेत एकाच व्यक्तीने दोन वेळा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या माहितीनुसार राज्यातील 4 हजार 168 शेतकऱ्यांनी 2 आधार क्रमांकाच्याद्वारे दोन वेळा पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे अशी माहिती उघडकीस आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकच खाते चालू ठेवून दुसरे खाते बंद करण्यात यावे असे आदेश सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.


ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान निधी योजनेचा गैरप्रकार केला आहे त्यांना अशी माहिती देण्यात आलेली अशा शेतकऱ्यांकडून रकमेची वसुलीही करण्यात येणार आहे. आणि असे पण सांगण्यात आले आहे की, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2 आधार क्रमांकद्वारे दोन वेळा पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना यापुढे त्यांनी दुरुस्ती न केल्यास त्या शेतकऱ्यांना तिथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

पीएम किसान निधी इथून पुढे लाभापासून वंचित

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये गैरप्रकार समोर आलेला आहे यामुळे राज्यातील 8 हजार 336 खात्याची पडताळणी करण्यात आलेली आहे. ही पडताळणी केल्यानंतर काही शेतकऱ्यांकडे दोन आधार आहेत असे स्पष्ट झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एकच आधार क्रमांक आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या संलग्र बँक खात्यातलाभाची रक्कम वितरित केली जाते. पण मात्र, या खात्यांची आधार दुरुस्ती प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे.

यामुळे या शेतकऱ्यांकडे दोन आधार असल्याचे स्पष्ट झालेले आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना दुरुस्ती झाल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ यापुढे देता येणार नाही अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेले आहे. यापुढे आता बंद करण्यात येणाऱ्या आधार क्रमांक चे खाते हे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून, तसेच या योजनेअंतर्गत त्या खात्यात अगोदर लाभ घेतलेल्या सर्व रकमेची वसुली करण्यात येणार आहे. अशी जबाबदारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे.

Leave a comment