soybean rate action : सोयाबीनला सरकारने हमीभाव ठरवून दिलेला आहे. आणि सरकारने ठरवून देण्यात आलेल्या हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधित व्यापारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वडगाव कृषी उत्पादक बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांनी दिली आहे. याबाबत बाजार समिती कार्यक्षेत्रातील सचिवांनी खरेदीदार व्यापाऱ्यांना सूचना पत्र सोमवारी दिलेली आहे. आणि त्यांना दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
soybean rate action सूचनापत्रात दिलेल्या माहितीनुसार
सूचना पत्रात दिलेल्या माहितीनुसा, केंद्र सरकारने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय केंद्रीय कृषि मंत्रालयाने समर्थन मूल्य योजनेअंतर्गत घेण्यात आलेला आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे लायसेन्स घेऊन खरेदी आणि विक्री करण्यात यावी. असे परस्परा व्यवहार करू नये तसेच यावर्षी सरकारने दिलेला सोयाबीन हमीभाव हा 4 हजार 890 निश्चित केलेला आहे.
सोयाबीनला सरकार कडून हमीभाव दिलेला असतानाही शेतकऱ्यांना कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ नये . नाहीतर व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व्यापाऱ्याने जर, शेतकऱ्याकडून शासनाने दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास पणन कायदा 34 आणि ’94 ड’ यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा बाजार समितीच्या सचिव जितेंद्र शिंदे यांनी दिली.
हे वाचा : सोयाबीन मूग उडीद हमीभावाने होणार खरेदी
शेतकऱ्यांवर कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ
सध्या राज्यामध्ये सोयाबीन आवकेचा हंगाम सुरू आहे परंतु राज्यांमध्ये सोयाबीनचे हमीभाव कमी असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. आणि अशा अवस्थेमध्येच कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे पीक चांगले आले असून पण चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने सोयाबीनला प्रतिक्विंटल 4 हजार 812 रुपये हमीभाव जारी केला आहे.
परंतु खुल्या बाजारामध्ये सरासरी 4 हजार ते 4 हजार 250 रुपयांनी विक्री होत आहे. केंद्र सरकारने सोयाबीनचे हमीभाव जारी केले असताना पण राज्यामध्ये कमी भावाने सोयाबीनची विक्री होत आहे. राज्य शासनाने अद्यापही हमीभाव केंद्र सुरू केले नाही यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन कमी दरामध्ये विकण्याची वेळ येत आहे.
soybean rate action सोयाबीनचे पीक
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे सोयाबीनचे चांगले आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र सुमारे 40 हजार हेक्टर वर आहे. सोयाबीन हे पीक शेतकऱ्यांसाठी कमी कालावधीमध्ये चांगले पैसे मिळवण्यासाठी नगदी पीक आहे, म्हणून या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकरी वळतात.
सोयाबीन ला भाव कमी मिळण्याचे कारणे
सोयाबीनचे भाव घसरण्याची अनेक कारणे असू शकतात आणि ती विविध घटकांवर अवलंबून असतात. ही काही प्रमुख कारणे आहेत
- पुरवठा आणि मागणी यांच्यातील फरक : – सोयाबीनचे उत्पादन जास्त आणि मागणी कमी असल्यास बाजारात जास्त पुरवठा झाल्यास भाव घसरण्याची शक्यता वाढते.
2. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी: – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून सोयाबीनचे दर घसरल्याने त्याचा फटका देशांतर्गत बाजारपेठेला बसतो आणि त्यामुळे निर्यातदार देशविशेषत: अमेरिका आणि ब्राझील मधील सोयाबीनचे उत्पादन आणि निर्यातीवर परिणाम होतो.
3.निर्यात नियमावली : – सरकारने घातलेल्या निर्यात निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मर्यादित विक्रीमुळे सोयाबीनचे दर कमी होऊ शकतात.
.4.सरकारी धोरण : सोयाबीनच्या किमतींवर विविध धान्यांवरील सरकारी अनुदान, एमएसपी किंवा करातील बदलांचा परिणाम होतो. एमएसपी कमी असेल किंवा सोयाबीनवरील सबसिडी कमी असेल तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
5. कच्च्या मालाची घटती मागणी : सोयारेलसारख्या सोयाबीनपासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या मागणीत काही घट झाली तर त्याचा फटका सोयाबीनच्या किमतींना बसतो.
6 . हवामान: सोयाबीन उत्पादनासाठी सर्वात मोठा शत्रू हवामान आहे. त्यामुळे हवामान चांगले असेल तर सोयाबीनचे जास्त उत्पादन आणि पुरवठा वाढल्याने बाजारात भाव घसरतात.
7. जमाखोरी (साठवणूक ): व्यापारी किंवा कंपन्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा करत असतात ज्यामुळे कृत्रिमरित्या किंमती नियंत्रित होतात.
8. जागतिक आर्थिक परिस्थिती: – जागतिक आर्थिक मंदी किंवा महागाईचा परिणाम कृषी उत्पादनांच्या बाजारपेठेवर होतो, परिणामी सोयाबीनचे भाव कमी होतात.
9. स्थानिक बाजार स्पर्धा: इतर तेलबिया उत्पादने, उदाहरणार्थ सूर्यफूल, मोहरी यांच्याशी स्पर्धा केल्याने सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होतो. इतर तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असेल आणि त्यांचे दर कमी असतील तर सोयाबीनस्पर्धात्मक दराने विकावे लागते.
2 thoughts on “कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल , कृषी उत्पादक बाजार समिती यांचा आदेश. soybean rate action”