पीक नुकसान पंचनामे न करता दिले जाणार सरसकट अनुदान
पीक नुकसान पंचनामे राज्यात अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले. या शेत पिकांचे भरपाई मिळवण्यासाठी पिकांचे पंचनामे केले जातात. या पंचनामाच्या आधारे कोणत्या भागात किती नुकसान झाले कोणत्या पिकाचे नुकसान झाले याचा अहवाल सरकारकडे शासकीय कर्मचाऱ्याद्वारे सादर केला जातो. परंतु सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक नुकसान पंचनामे करण्याची आवश्यकता नाही. असे सांगून सरसकट शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
हे वाचा :
कोणाला मिळणार नुकसान भरपाई
राज्यातील बहुतांश भागात विशेषता मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे जास्त प्रमाण आहे म्हणून या भागातील जवळपास सर्व शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे म्हणून शासनाकडून याबाबत पिक नुकसान पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आयुक्तालयाकडून या बाबत सादर केलेल्या अहवाला दरम्यान दिवसेंदिवस पीक नुकसानीच्या तक्रारी तसेच नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये वाढ होत असल्यामुळे शासनाकडून आता पंचनामे करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची पिकाचे नुकसान झाले आहे त्या भागातील अधिकाऱ्याकडून पंचनामा रिपोर्ट सादर केल्यानंतर त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
किती मिळणार मदत
राज्य शासनाने जरी पीक नुकसान पंचनामे करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले असले आणि सरसगट शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार अशी घोषणा जरी केली असली तरी यामध्ये प्रति शेतकरी किंवा प्रतिहेक्टर कोणत्या पिकाला किती अनुदान देण्यात येणार आहे याबाबतची आणखी कसली स्पष्टता दिलेली नाही याबाबतची स्पष्टता देण्याकरिता मंत्रिमंडळात बैठक घेण्यात येईल व या बैठकीत ठरवण्यात आलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल असेही कृषिमंत्री यांच्याकडून सांगण्यात आले आहे.