मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: साठी पेमेंट करावे का? पहा सविस्तर माहिती .

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन, राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये 2015 पासून विविध सौर कृषी पंप योजना राबवत आहेत. सौर ऊर्जा शेतकऱ्यांसाठी शेती अधिक उत्पादनक्षम आणि खर्चसहनीय बनवण्याचे एक प्रभावी साधन ठरले आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र सरकारच्या विविध सौर कृषी पंप योजनांमुळे आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला असून , सौर ऊर्जेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा आणि सौर कृषी पंपांना शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने सौर कृषी पंप योजना सुरू करण्याची घोषणा केली होती . त्यामुळे या योजनेअंतर्गत मागील दोन महिन्यापासून या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात होते, पण मात्र आता या अर्जांना पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणून, तुमचे पेमेंट पर्याय उपलब्ध आहे का ते तुम्ही तपासू शकतात.

सौर कृषी पंप योजनांचा मागील इतिहास

महाराष्ट्र सरकारने 2015 पासून महाराष्ट्रात विविध सौर कृषी पंप योजना राबवत आहेत .या अगोदर अटल सौर कृषी जलपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी जलपंप योजना आणि प्रधानमंत्री कुसुम योजना राबवण्यात आली आहे. याशिवाय, सध्या प्रधानमंत्री कुसुम पॅकेज – प्लॅन बी अंतर्गत सौर कृषी पंप बसवले जात आहेत. 

या योजनांमुळे आतापर्यंत 2,63,156 सौर पंपांची यशस्वी स्थापना झाली आहे. सौर ऊर्जा शेतकऱ्यांना वीज भारनियमनाच्या समस्यांपासून मुक्त करते आणि सिंचनासाठी खर्चही कमी करते. त्यामुळे सौर पंपांना शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हे वाचा : या शेतकऱ्यांना मिळणार प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ ; पहा कोणते शेतकरी होणार पात्र ?

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना साठी पेमेंट पर्याय आला का नाही ते पाहण्याची पद्धत

तुमचे पेमेंट ऑप्शन चेक करण्याची पद्धत

  • पेमेंट ऑप्शन चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर ://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=trackA1FormStatus जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक (एमके आयडी) प्रविष्ट करा आणि सर्च करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अर्ज तपशील आणि पंप तपशील दिसेल, त्यामध्ये Proceed Payment हा पर्याय दिसेल.
  • त्यानंतर तुम्ही Proceed To Payment वर क्लिक करा, आणि त्यानंतर Pay NOW वर क्लिक करून UPI किंवा DEBIT CARD द्वारे पेमेंट करा.
  • तुमचे पेमेंट केल्यानंतर अर्ज तपासला जाईल आणि Vendor Selection चा पर्याय येईल, आणि त्यानंतर पंपाची स्थापना करण्यात येईल.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पेमेंट ऑप्शन चेक करू शकतात.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पंपासाठी खर्च

  • 3 एचपी पंप: ₹22,971
  • 5 एचपी पंप: ₹32,075
  • 7.5 एचपी: 44929

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पेमेंट करण्याआधीची महत्वाची सूचना

  • अर्ज परिपूर्ण आहे का?
    जर तुम्ही अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे (जसे की सातबारा, विहीर/बोअरवेल प्रमाणपत्र) अपलोड केली असतील तरच पेमेंट करा.
  • त्रुटी असल्यास काय होईल?
    पेमेंट केल्यानंतर अर्जात त्रुटी असल्यास, रक्कम परत मिळवणे वेळखाऊ ठरू शकते.
  • धीराने निर्णय घ्या:
    अर्ज तपासून पूर्ण खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. परंतु, अर्जाची छाननी योग्य असल्याची खात्री करूनच पेमेंट करा. सौर पंप बसवल्यामुळे तुमच्या शेतीचे खर्च कमी होतील आणि वीज भारनियमनाचा त्रास टाळता येईल. योग्य प्रक्रिया पूर्ण करून सौर ऊर्जेचा लाभ घ्या.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

Leave a comment