शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अंतर्गत 100% अनुदानावर मोफत फवारणी पंप.Mofat Favarni Pump yojana   

Mofat Favarni Pump yojana :  नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये महाडीबीटी अंतर्गत मोफत फवारणी पंप अनुदान योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या महाडीबीती अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना राबवल्या आहेत. तसेच , शेती अधिक उत्पादनक्षम वाढविन्रया साठी राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवलया जातात . अशीच एक योजना महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मनुष्यचलिन फवारणी पंप अनुदान योजना.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

फवारणी पंप अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती कामासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप, देण्यात येणार आहे तसेच इंजन फवारणी पंप, सोलर वर चालणारा फवारणी पंप देण्यात येणार आहे. तर आज आपण या लेखामध्ये फवारणी पंप अनुदान योजनेचा अर्ज कसा करायचा, यासाठी लागणारी कोण कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, त्याचबरोबर योजनेची योग्य पात्रता काय असेल याबद्दल सविस्तर माहिती यामध्ये आपण पाहणार आहोत.

या अगोदर पण महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदाही घेतलेला आहे. तसेच आत्ता पण महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीतील कामांसाठी फवारणी पंप 100% अनुदानावर राबवण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्याने पुरेपूर लाभ घ्यावा. तसेच ,ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

Mofat Favarni Pump yojana योजनेचे मुख्य उद्दिष्ट

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत लागणारी यांत्रिकी साधने अनुदानावर उपलब्ध करून देऊन शेतीचे काम सुलभ आणि कमी खर्चिक करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. फवारणीसाठी लागणाऱ्या पंपाचा खर्च उचलणे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कठीण असते. त्या मुळे महाडीबीटी योजने आतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात फवारणीसाठी स्वयंपूर्ण होण्याची संधी मिळणार आहे .

हे वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: साठी पेमेंट करावे का? पहा सविस्तर माहिती .

Mofat Favarni Pump yojana फवारणी पंप अनुदान योजनेचे फायदे

स्वतःचे पंप: शेतकऱ्यांना शेतीतील कामासाठी इतरांकडून पंप भाड्याने घेण्याची गरज पडणार नाही.

उत्तम फवारणी प्रक्रिया: फवारणी पंप शेतकऱ्याना सोयाबीन, कापूस,तूर ,हरभरा यांसारख्या विविध पिकांवर सहज फवारणी करता येईल.

वेळेची बचत: फवारणी जलद गतीने होऊन वेळेची बचत होते.

Mofat Favarni Pump yojana अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

महाडीबीटी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत:

  1. 7/12 उतारा आणि 8 अ उतारा.
  2. शेतकऱ्याचे आधार कार्ड
  3. जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
  4. बँक पासबुक झेरॉक्स
  5. शेती पिकांची माहिती
  6. सक्रिय मोबाईल क्रमांक
  7. उत्पन्न प्रमाणपत्र
  8. अपंग प्रमाणपत्र (शेतकरी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असेल तर आवश्यक)
Mofat Favarni Pump yojana

Mofat Favarni Pump yojana ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करा:

  • या योजेनेच अर्ज करण्या साठी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • त्या नंतर मुख्य पृष्ठावर जा आणि “कृषी विभाग” पर्यायावर क्लिक करा.
  • कृषी विभाग या पर्यायावर क्लिक केल्या नंतर योजनेच्या पर्यायांमध्ये “कृषी यांत्रिकीकरण” हा पर्याय निवडुन घ्या .
  • त्या नंतर फवारणी पंप अनुदान हा पर्याय निवडून घ्या आणि अर्ज भरून सबमिट करा.
  • त्या नंतर आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत अपलोड करा.
  • व सर्व माहिती अचूक भरून अर्ज जतन करा.

Mofat Favarni Pump yojana शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

महाडीबीटी योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीतील कामे सुलभ आणि प्रभावी पद्धतीने करण्याची संधी मिळणार आहे. फवारणीसाठी स्वयंपूर्ण होऊन उत्पादन क्षमता वाढवणे शक्य होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून सरकारी मदतीचा फायदा घ्यावा.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अंतर्गत 100% अनुदानावर मोफत फवारणी पंप.Mofat Favarni Pump yojana   ”

Leave a comment