सोलर पॅनल कर्ज बसवण्यासाठी SBI बँकांकडून 4 लाख 50 हजाराचे दिले जाणार कर्ज , व्याजदर आणि किती हप्ता भरावा लागणार आहे पहा सविस्तर माहिती.

सोलर पॅनल कर्ज : योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर आहे . अशा नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून 1 किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानामार्फत स्वतःचं घर असणारे नागरिक आपल्या घरावर सोलर पॅनल बसून मोफत वीज योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे तुमची वीज बिलापासून सुटका होणार आहे.

सोलर पॅनल

सोलर बसवण्यासाठी किती अनुदान दिले जाते

स्वतःची घर असणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून 1 किलो वॅट ते 10 किलो वॅट पर्यंत सोलर बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी या योजनेअंतर्गत नागरिकांना 1 किलो वॅट सोलार बसवण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून, 2 किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 60 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे ,तर 3 किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानावर किती व्याजदर आणि किती हप्ता भरावा लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना

SBI बँकांकडून सोलर बसवण्यासाठी लोन

SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारतातली सरकारी सर्वात मोठी बँक आहे. या बँकांकडून देशातील नागरिकांना परवडन असे कर्ज दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घेण्यासाठी ही बँक सर्वात उत्तम आहे. एसबीआय बँकांकडून ग्राहकांना कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यवसायिक कर्ज, सुवर्ण तारण कर्ज ,वैयक्तिक कर्ज दिले जाते.


याबरोबरच एसबीआय बँकेकडून सोलर बसवण्यासाठी पण कर्ज देण्यात येते. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलापासून सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून सोलर इन्स्टॉल करण्यासाठी हे अनुदान देण्यात येते, यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना एसबीआय बँक कडून कर्ज दिले जाणार आहे. ग्राहकाला स्वहिस्सा भरण्यासाठी लागणारी रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येते.
पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत विज देण्यात येणार आहे. पीएम सूर्य करे योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी कुटुंबाला मोफत वीज योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

तसेच या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर आहे त्या नागरिकांना 1 किलो वॅट पासून ते 10 वॅट पर्यंतचे सोलार बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत 1 किलो वॅट सोलर बसवण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान दिले जाते, तर 2 किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी 60 हजार रुपये आणि 3 किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांच्या अनुदान दिले जाणार आहे.
एसबीआय बँकेकडून सोलर बसवण्यासाठी कर्जही उपलब्ध करून दिले जाते. तर,खालील प्रमाणे एसबीआय बँकेकडून सोलर बसवण्यासाठी किती खर्च उपलब्ध करून दिले जाते याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

SBI बँकेकडून किती कर्ज दिले जाते

sbi बँकेकडून 3 किलो वॅट सोलर बसवण्यासाठी 2 लाख रुपयांची कर्ज 7% व्याज दराने दिले जात आहे, ही माहिती एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध माहितीनुसार कळविण्यात येत आहे.
तसेच एसबीआय बँकेकडून 3 किलो वॅट पासून ते 10 किलो वॅट क्षमतेच्या सोलर बसवण्यासाठी कमीत कमी सहा लाख रुपये कर्ज दिले जात आहे.
तसेच, होम लोन असणाऱ्या नागरिकांना 9.15% आणि ज्या नागरिकांकडे होम लोन नाही अशा नागरिकांना 10.15% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
4 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर किती हप्ता भरावा लागेल?
ज्या नागरिकांकडे होम लोन नाही अशा नागरिकांना सोलार बसवण्यासाठी 4 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज 5 वर्षाच्या कालावधीसाठी 10.15% व्याजदराणे ने उपलब्ध झाले आहे तर त्यांना 9594 रुपयांचा महिन्याला हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच नागरिकांना या काळात 5 लाख 75 हजार 640 रुपये भरावी लागतील. म्हणजे सध्या चालू काळामध्ये 1 लाख 25 हजार 640 रुपये व्याज म्हणून द्यावी लागणार आहेत.

Leave a comment