Sant Bhagwan Baba Accident Insurance Scheme 2024 राज्यामधील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, आणि मुकादम इत्यादींसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे याबद्दल राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुरावा केला होता परिणामी या निर्णयाचे राज्यामधील शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून या अंतर्गत त्या संदर्भातील योजना प्रस्तावित केली होती या योजनेअंतर्गत राज्यांमधील दहा लाख ऊसतोड कामगार वाहतूक कामगार, आणि मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैल जोड्या त्याबरोबरच कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विमा निर्णय लागू करण्यात आले होते या योजनेचा संपूर्ण खर्च स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या भांडवलातून करण्यात येणार आहे. कामगार मुकादम आणि कारखाना यापैकी कोणावरही कसलाही आर्थिक भार राहणार नाही.
Sant Bhagwan Baba Accident Insurance Scheme 2024 संपूर्ण माहिती :
Sant Bhagwan Baba Accident Insurance Scheme 2024 ऊस तोडणी व वाहतुकी दरम्यान अनेक अपघात विजेचा शॉक, सर्प दोष 12 व पावसाने नुकसान रस्ते अपघाती यासारख्या शेकडो समस्यांना तोंड देत असताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात अनेक जण कायमस्वरूपी अपंग होतात व त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो त्यामुळे या ऊसतोड कामगारांना आणि वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशुंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास हार्दिक मदत अपंग आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा विविध तरतुदी असाव्यात असे धनंजय मुंडे यांनी प्रस्तावित केले होते.
हे वाचा : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा 2024
ऊस तोड कामगार कल्याण महामंडळ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करून घेत धनंजय श्री मुंडे यांनी या महामंडळाला मुख्य स्वरूप दिले आहे महामंडळाचे कार्यकारी संचालक मंडळ तसेच लेखाशीर्ष निर्माण करून ऊस तोड कामगारांची प्रथमच ऊसतोड कामगार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे साखर कारखाना व त्याच्या समप्रमाणात निधी शासनाकडून अशी कायमस्वरूपी निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.
काय म्हणाले कृषिमंत्री धनंजय मुंडे ?
Sant Bhagwan Baba Accident Insurance Scheme 2024 मुख्यमंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ व नियोजन विभागाच्या समन्वयातून या योजनेला मान्यता दिली असून त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे ऊस तोडी कामगारांना विम्याचे कवच असणे आवश्यक आहे हे दिंगत गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न प्रशासनामुळे पूर्ण केले त्याचा मनापासून आनंद होत आहे याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार मानतो.