मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना नुकसान भरपाई 987 कोटींची मदत nuksan bharpai

nuksan bharpai मराठवाड्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी. शासनाने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर मदत वितरित केली जाईल असेही आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार बीड, लातूर, परभणी या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी 987 कोटी 58 लाख ते तीस हजारांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे.

मराठवाड्यामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी, पूर, यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते.
त्यानुसार मराठवाड्यातील ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, शासनाने निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 997 कोटी 4 लाख 36 हजार रुपये निधी वितरण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : अंबिया बहार पीक विमा अर्ज सुरू ; ‘ही’ आहे अंतिम तारीख

nuksan bharpai जिल्हानिहाय मदत

ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड, लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यात नुकसान झालेल्या 4 लाख 42 हजार 447 हेक्टर नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी नुकसान ग्रस्त 6 लाख 9 हजार 579 शेतकऱ्यांना 603 कोटी 43 लाख 95 हजार रुपये वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. या तीन जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाई साठी 603 कोटी 43 लाख 95 हजार रुपये वितरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

बीड, लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मंजूर करण्यात आली?

  • ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या 79 हजार 492 शेतकऱ्यांच्या 40 हजार 169 हेक्टर क्षेत्रासाठी नुकसान झालेल्या नुकसान भरपाईसाठी 54 कोटी 62 लाख 98 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
  • ऑगस्टमध्ये लातूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या 326 शेतकऱ्यांच्या 155 हेक्टर क्षेत्रासाठी नुकसान झालेल्या भरपाईसाठी साठी 21 लाख 8 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत .
  • सप्टेंबर मध्ये परभणी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या 5 लाख 29 हजार 761 शेतकऱ्यांसाठी 4 लाख 2 हजार १२३ हेक्टर क्षेत्रासाठी नुकसान झालेल्या भरपाई साठी 548 कोटी 59 लाख 89 हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

nuksan bharpai या व्यतिरिक्त सप्टेंबर मध्ये लातूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या 3 लाख 58 हजार 767 शेतकऱ्यांच्या 2 लाख 82 हजार 458 हेक्टर क्षेत्रासाठी 384 कोटी 14 लाख 38 हजार रुपये लातूर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे

Leave a comment