crop loan परभणी जिल्ह्यातील यावर्षी (2024) खरीप हंगामात (एप्रिल ते सप्टेंबर) विविध बँकांना 1 हजार 470 कोटी 97 लाख रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. परंतु सोमवारी एकूण 85 हजार 800 शेतकऱ्यांना 696 कोटी 12 लाख रुपये (47.32 टक्के) पिक कर्ज वितरित करण्यात आले आहे.
crop loan यावर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (107.55 टक्के) आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक (101.66 टक्के) एवढे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सध्या केले. पण राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांचे पीक कर्ज वाटप 30% च्या आतच राहिले. जिल्ह्यात एकूण खरी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्टे सलग पाचव्या वर्षी अर्धवट राहिले आहे.
crop loan पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टे
यावर्षी खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील एक हजार 470 कोटी 97 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण, सरकारी, खाजगी अशा मिळून एकूण 17 बँकांना हे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून. त्यात सर्व राष्ट्रीयकृत बँकांना (व्यापारी बँक) मिळून एकूण 947 कोटी 88 लाख रुपये तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेला 227 कोटी 39 लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 172 कोटी 94 लाख रुपये, खासगी बँकांना 122 कोटी 76 लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांच्या फायद्याची पीक कर्ज योजना
crop loan सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी अखेर पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी 20 हजार 875 शेतकऱ्यांना 246 कोटी 11 रुपये पीक कर्ज वाटप केलेले आहे आणि 25.96 टक्के उद्दिष्ट सध्या केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 22 हजार 447 शेतकऱ्यांना 231 कोटी 17 लाख रुपये (10.1.66) तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 40 हजार 757 शेतकऱ्यांना 185 कोटी 99 लाख रुपये (107.55) म्हणजेच उद्दिष्ट पेक्षा जास्त वाटप केले.
खाजगी बँकांनी 1 हजार 721 शेतकऱ्यांना 32 कोटी 85 लाख रुपये पिक कर्ज वाटप २६. ७६ टक्के उद्दिष्टे सध्या केले आहे. तर यावर्षीच्या खरीप हंगामात 10 हजार 364 शेतकऱ्यांना 109 कोटी 58 लाख रुपये नवीन पिक कर्ज वाटप करण्यात आली असून, तर 75 हजार 436 शेतकऱ्यांनी 586 कोटी 54 लाख रुपये रकमेच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे.