homeguard mandhan: राज्यातील होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ, आता प्रतिदिन मिळणार1083 रुपये

homeguard mandhan : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होमगार्डच्या मानधना त दुप्पट वाढ करण्याचा निर्णय एक ऑक्टोंबरला घेण्यात आला होता. याबाबत शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी होमगार्डच्या मानधना त भरीव वाढ केली असून प्रतिदिन 570 वरून 1083 रुपये वाढ केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एक आक्टोंबर ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यावेळेस या निर्णयाचा लाभ राज्यातील 40 हजार होमगार्डना होईल असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आलेला होता. आणि त्यावेळेस ते असेही म्हणाले होते ही वाढ कर्तव्य भत्त्यापासून ते भोजन भत्त्यापर्यंत सर्व भत्त्यांमध्ये करण्यात येईल, त्यावेळेस असेही सांगण्यात आले होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : आपले सरकार केंद्र चालकांना मिळणार 10000 रुपये मानधन


या निर्णयाप्रमाणेच राज्य शासनाकडून 9 ऑक्टोंबर रोजी राज्यातील होमगार्डसचे मानधन दुप्पट करण्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या होमगार्डसचे मानधन प्रतिदिन 570 वरून 1083 रुपये म्हणजेच दुप्पट करण्यात आले आहे.

homeguard mandhan दुप्पट वाढ

homeguard mandhan यावर देवेंद्र फडणवीस यांनी,होमगार्ड्च्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. हे मानधन देशातील सर्वाधिक असल्याचा दावा फडणवीस यांनी केलेला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी विविध भत्त्यांची रकमेमध्ये सुद्धा दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तर, उपहार भत्ता 100 वरून 200 दोनशे रुपये आणि भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये एवढा करण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे.


तसेच राज्यातील सरासरी 55000 होमगार्डना या वाढीव भत्त्याचा लाभ मिळेल. हा वाढीव भत्त्याचा लाभ 1 ऑक्टोंबर 2024 पासून देण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली असून, तर मागील महिन्यात सुमारे 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे. सध्या त्याचे प्रशिक्षण करण्यात येत आहेत असे देवेंद्र फडणवीस हे म्हणाले.

होमगार्ड मानधन वाढ शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment